शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी 'एमपी'चे पथक औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:03 IST

मध्य प्रदेश येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक औरंगाबादमध्ये दुपारी एक वाजता दाखल झाले

ठळक मुद्देसर्व मजूर मध्य प्रदेश येथील आहेत पहाटे रेल्वे रुळावर झोपले असता चिरडून १६ मजूर ठारभोपाळ येथून एका चार्टर्ड विमानाने हे पथक दुपारी १ वाजता दाखल झाले

औरंगाबाद : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची चौकशीसाठी मध्य प्रदेश येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. यात ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर मीना सिंघ, आयसीपी केसरी सिंघ, आयपीएस राजेश चावला आणि आणखी एक जणाचा यात समावेश आहे.

भोपाळ येथून एका चार्टर्ड विमानाने हे पथक दुपारी १ वाजता विमानतळावर दाखल झाले आहे. अपघाताविषयी हे पथक चौकशी करणार असल्याचे समजते. जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. शुक्रवारी पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर गंभीर जखमी दोघांचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. 

औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांची नाव :1)धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. शाहडोल, राज्य - मध्य प्रदेश.2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश11) संतोष नापित, 12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.16) दिपक सिंग अशोक सिंग गौड  रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश---------------------जखमी व्यक्ती :1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे, रा. पोंडी, ता. जुनावणी, जिल्हा मंडल खजेरीजिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (वय 20 वर्ष), रा. पोवडी, ता. घोगरी, जिल्हा मांडला2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (वय 27 वर्ष),  रा. ममान, ता. पाली, जिल्हा उमरिया3) शिवमानसिंग हिरालाल गौर (वय 27 वर्ष) रा. शाहारगड, ता. शाही, जिल्हा शाहडोल

टॅग्स :Aurangabad Railway Tragedyऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनाAccidentअपघातDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद