एम.फिल.च्या अनावश्यक अभ्यासक्रमाचा ‘वर्कलोड’
By Admin | Updated: July 7, 2015 00:55 IST2015-07-07T00:34:57+5:302015-07-07T00:55:43+5:30
नजीर शेख , औरंगाबाद ‘नेट’, ‘सेट’ किंवा ‘पेट’ या प्राध्यापकपदासाठी तसेच पीएच. डी. साठी पात्र असलेल्या परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये एम. फिल. या नावाने

एम.फिल.च्या अनावश्यक अभ्यासक्रमाचा ‘वर्कलोड’
नजीर शेख , औरंगाबाद
‘नेट’, ‘सेट’ किंवा ‘पेट’ या प्राध्यापकपदासाठी तसेच पीएच. डी. साठी पात्र असलेल्या परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामध्ये एम. फिल. या नावाने अनावश्यक अभ्यासक्रम चालू असून, यामुळे अनेक विभागातील प्राध्यापकांवर अनावश्यक ‘वर्कलोड’ (कामाचे तास) निर्माण झाला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
१९९२ पूर्वी एम. फिल. हा दोन वर्षांचा संशोधनपर अभ्यासक्रम प्रतिष्ठेचा मानला जात असे. प्राध्यापकपदासाठी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी प्राध्यापकपदासाठी पात्र असत. त्यावेळी दोन वर्षांचा एम. फिल. कोर्स केलेल्या उमेदवारांची अधिकची पात्रता समजली जायची. १९९२ ला प्राध्यापकपदासाठी नेट (नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट) आणि सेट (स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट) या दोन परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले. तसेच पूर्वी एम. फिल. हा पीएच. डी. पूर्व संशोधनाचा पाया गृहीत धरला जायचा. सध्या अनेक विद्यार्थी पीएच. डी. संशोधनासाठी पदव्युत्तर पदवीनंतर थेट प्रवेश घेताना
विद्यापीठात एम. फिल. चा अभ्यासक्रम चालू असलेले विभाग पुढीलप्रमाणे : मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पाली व बुद्धीझम, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्य, ग्रंथालय व माहितीशास्त्र, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र.