शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समितीत मोसंबीची आवक मंदावली..!

By admin | Updated: September 4, 2015 00:26 IST

जालना : मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देता मोसंबी लागवडीवर भर दिला

जालना : मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची ओळख आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देता मोसंबी लागवडीवर भर दिला. मात्र नगदी पिकालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पाण्याअभावी मोसंबीचे फळ पूर्ण भरत नसल्याने आवक मंदावल्याचे चित्र असून, भावही गडगडले असल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीचा स्वतंत्र बाजार भरतो. मागील काही दिवसांपासून आवक नसल्याने मार्केट बंद होते. आठ ते दहा दिवसांपूर्वी ते पूर्ववत सुरु झाले आहे. परंतु आवक कमी होत असल्याचे व्यापारी तसेच बाजार समितीतून सांगण्यात आले. गुरुवारी मोसंबी मार्केटमध्ये ४०० क्विंटल आवक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० रुपयां दरम्यान प्रति टनाचा भाव आहे. गतवर्षीच्या तुलनेत आवक तसेच भावातही तफावत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. यामुळे मोसंबी बागांना पाणी देणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे मोसंबीचे फळ पूर्ण भरण्यास अडचणी येत आहेत. आकारही लहान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजार समितीचे भगवान शिंदे म्हणाले की, गुरुवारी मोसंबीची आवक ४०० क्ंिवटल एवढी झाली. काही दिवसांपासून आवक कमी झाली आहे. भावही १४ ते १५ हजार रुपये प्रति टन एवढा आहे.दरम्यान गत काही वर्षांपासून मोसंबीलाही ग्रहण लागले आहे. पाण्याअभावी मोसंबी बागा जळून जात आहेत. गतवर्षी काही शेतकऱ्यांनी पाणीच नसल्याने स्वत:हून बागांवर कुऱ्हाड चालविली. या वर्षीही अशीच स्थिती येण्याची भीती शेतकऱ्यांना लागून आहे. जिल्ह्यात २५ हजार हेक्टर मोसंबीचे क्षेत्र असून, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात क्षेत्र चांगले आहे. दुष्काळाचे ग्रहण बागांना लागल्याचे चित्र आहे.