राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

By Admin | Updated: December 13, 2014 23:56 IST2014-12-13T23:56:28+5:302014-12-13T23:56:28+5:30

लातूर : लातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी बोरगाव काळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

Movement for various demands of Nationalist Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध मागण्यांसाठी आंदोलन


लातूर : लातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी बोरगाव काळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़
हवामान अधारित पिकविमा मंजूर करून वाटप करा, उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रूपये भाव द्या, सोयाबीनला ४५०० भाव द्यावा, चारा छावण्या सुरू कराव्यात, दुधाला प्रतिलिटर ५० रूपये भाव द्यावा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिस माफ करावी, कर्ज व विज बिल माफ करावे, नादुरूस्त डी़पी़ तात्काळ दुरूस्त कराव्यात, जून-जुलै महिन्यात लागवड करण्यात आलेल्या उसाला १ लाख रूपये अनुदान द्यावे, ६० वर्षांपुढील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, ठिबक सिंचन व स्प्रिंकलरचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे, लातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आले़
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी़एऩशेळके, श्रीकांत सूर्यवंशी, बबन भोसले, प्रदेश सचिव संजय बनसोडे, अशोक गोविंदपूरकर, मदन काळे, लक्ष्मीकांत तवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्ष्मीकांत तवले, तालुकाध्यक्ष बख्तावर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचा आरोप शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले़ यावेळी उपस्थितांचीही भाषणे झाली़ (प्रतिनिधी)४
बोरगाव येथे शनिवारी सकाळी १० वाजता झालेल्या आंदोलनामुळे जवळपास १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती़ लातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली़ यावेळी परमेश्वर पवार, युवराज वीर, परमेश्वर माळी, सुधाकर वायाळ, सुरेश मांदळे, काका गाडे, प्रविण देशमुख, विजय वाघमोडे, विनायक काळे, आकाश कणसे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Movement for various demands of Nationalist Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.