शिक्षकांचे आजपासून धरणे आंदोलन
By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:03:15+5:302016-03-14T00:21:54+5:30
नांदेड : मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षक विरोधी भूमिकेच्या संदर्भात व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शिक्षक प्रत्येक शाळेत काळ्या फिती लावून काम करणार

शिक्षकांचे आजपासून धरणे आंदोलन
नांदेड : जि़ प़ शिक्षक व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षक विरोधी भूमिकेच्या संदर्भात व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शिक्षक प्रत्येक शाळेत काळ्या फिती लावून काम करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी दिली़
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के हे शिक्षकांना वेठीस धरून त्यांच्याकडून वेठबिगार मानसिकतेतून वागणूक देत असल्याचा आरोप करून शिक्षकांच्या न्याय्य हक्क मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे़ विभागीय आयुक्तांनी लेखी आदेश दिलेल्या १३ शिक्षकांचे निलंबन रद्द करून सेवेत पुनर्स्थापना करावी, दुष्काळ परिस्थिती व पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर असल्याने मार्च व एप्रिल महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात परंपरे- प्रमाणे भरविण्याचे आदेश द्यावेत, १२ आॅक्टोबर २०१५ च्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात सहभागी शिक्षकांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीस रद्द कराव्यात, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.