शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जुन्या पेन्शनसाठी काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:56 PM

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शासनाने मागणी मान्य करेपर्यंत विविध मार्गांनी शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

औरंगाबाद : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांतर्फे शाळेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. शासनाने मागणी मान्य करेपर्यंत विविध मार्गांनी शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या; परंतु संबंधित शाळेला अनुदान नसणाऱ्या किंवा टप्पा अनुदानावर असलेल्या शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बंद केली. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे क्रमप्राप्त असून, तो त्यांचा हक्क आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची नियुक्ती असल्याने त्या सर्व शिक्षकांना नियम, कायद्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वेळोवेळी लक्ष वेधले, तरीही शासनाने दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक-शिक्षकेतर संघटना, नॅशनल टीचर्स युनियन, उर्दू शाळा संघर्ष समिती, विनाअनुदानित कृती समिती या संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी (दि. १७) काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, प्रा. बंडू सोमवंशी, वाहेद शेख, प्रवीण वेताळ, इल्लाउद्दीन फारुकी, नितीन कवडे, प्रदीप डोणगावे, सुनील शेरखाने, बालाजी भगत, सिद्धेश्वर कस्तुरे, रवी खोडाळ, गुलाब शेख, सुधाकर पवार, दिलीप कोळी, डी. आर. चव्हाण, शाहूराज मुंगळे, चंद्रकांत चव्हाण, विजय साबळे, विजय चव्हाण, मिर्झा सलीम बेग, प्रा. शेख मनसूद, प्रल्हाद शिंदे, परवेज कादरी, इमाम सर, मिर्झा इजाज बेग यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक