मातंग समाजाचे आंदोलन

By Admin | Updated: July 19, 2014 00:43 IST2014-07-18T23:46:34+5:302014-07-19T00:43:43+5:30

जालना : मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण देण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी भारतीय बहुजन महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तासभर धरणे आंदोलन करण्यात आले.

The movement of the Mathang community | मातंग समाजाचे आंदोलन

मातंग समाजाचे आंदोलन

जालना : मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण देण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी भारतीय बहुजन महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तासभर धरणे आंदोलन करण्यात आले.
मातंग समाजाला इतर समाजाप्रमाणेच अनुसूचित जातीत अ. ब. क़ ड. अशी वर्गवारी करून ८ टक्के आरक्षण देण्यात यावे, यासाठी सातत्याने समाजाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. मात्र, समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे शुक्रवारी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्या आदेशानुसार जेल भरो आंदोलन मागे घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा द्वारकाबाई लोंढे, गोपी घोडे, लखन मिसाळ, सखाराम रणपिसे, भाऊसाहेब लाखे, कौशल्याबाई चांदणे, ताराबाई चांदणे, जॉन्सन पाखरे, भिकन गायकवाड, वसंता ससाणे, अमोल रंधवे, चंदाबाई मिसाळ, श्याम गायकवाड, जमनाबाई आव्हाड, कविता लोंढे होते. (प्रतिनिधी)
क्रांती सेनेचेही धरणे
लहुजी साळवे यांच्या जयंंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्ट रोजी शासकीय सुटी देऊन जिल्ह्यातील मद्याची दुकाने बंद ठेवावी, मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावे या व अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश दाभाडे, मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे, प्रभाकर गोफणे, भानुदास नाडे, भास्करराव कांबळे, सखाराम जाधव आदींची उपस्थिती होती.
मुुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
आरक्षणाच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता; त्यामुळे याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांना या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने जेलभरो आंदोलन मागे घेत असल्याचे सांगून तासभर धरणे आंदोलन केले.

Web Title: The movement of the Mathang community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.