वंचित बहुजन आघाडीचे फुलंब्री तहसील समोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:26+5:302021-02-05T04:08:26+5:30
फुलंब्री तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजू प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. केंद्र सरकारने ...

वंचित बहुजन आघाडीचे फुलंब्री तहसील समोर आंदोलन
फुलंब्री तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजू प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या माथी मारलेले तीन काळे कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सोपविण्यात आले. यावेळी काकाजी सिरसाठ, सुखदेव नरवडे, बबन प्रधान, कडूबा रघु, सय्यद शौकत, गौतम गंगावणे, विलास गंगावणे, संजय तुपे, बाळकृष्ण साळवे, अमोल प्रधान, सुरेश प्रधान, राहुल उबाळे, संजय खरात, सचिन पगारे, बाबूराव तुपे, प्रदीप शेजवळ, योगेश प्रधान, गणेश शेजवळ, शिवा पंडित, अन्ना प्रधान, भास्कर साळवे, साईनाथ तुपे आदींसह शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
फोटो कॅप्शन : फुलंब्री तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते.