पंचायत समिती समोर संगणक परिचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:54+5:302021-02-05T04:16:54+5:30
अन्यायकारक असलेले दोन शासन निर्णय निर्गमित केले आहेत. एका शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना पूर्वी असलेल्या सहा हजार रुपये मानधनात ...

पंचायत समिती समोर संगणक परिचालकांचे आंदोलन
अन्यायकारक असलेले दोन शासन निर्णय निर्गमित केले आहेत. एका शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना पूर्वी असलेल्या सहा हजार रुपये मानधनात फक्त हजार रुपयांची वाढ करून संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलेले आहे. या दोन्ही शासन निर्णयांचा निषेध करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर काळी फीत लावून घोषणाबाजी करून दोन्ही शासन निर्णयांची होळी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ, उपाध्यक्ष सुनील शेजूळ, सचिव पांडुरंग पडूळ, दीपक सांगळे, जिल्हा कमिटी सदस्य इसाक पठाण, विनोद केदारे, भगवान खंडागळे, नंदा खटके, मोहिनी शेळके, भरत शेजुळ, अर्जुन कुबेर, मोहन चौधरी, आदेशकुमार वाकोडे, अनिल जोनवाल, आकाश जैवाळ, अजय खरात, रामबाई गोमलाडू, आदींची उपस्थिती होती.
------
-( फोटो कॅप्शन) गटविकास आधिकारी प्रकाश दाभाडे यांना निवेदन देतांना संघटनेचे पदाधिकारी.