पथकर वसुली रद्द करण्याच्या हालचाली

By Admin | Updated: July 21, 2014 00:35 IST2014-07-21T00:16:02+5:302014-07-21T00:35:54+5:30

औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या असल्या, तरी शासन दरबारी मात्र पथकर ही प्रक्रियाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

Movement of cancellation of recovery | पथकर वसुली रद्द करण्याच्या हालचाली

पथकर वसुली रद्द करण्याच्या हालचाली

औरंगाबाद : मनपाने पथकर (प्रवेश शुल्क) नाक्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू केल्या असल्या, तरी शासन दरबारी मात्र पथकर ही प्रक्रियाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पालिकेला यावर्षी पथकर वसुलीतून २२ कोटी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पथकर वसूल करणे रद्द झाले, तर ही रक्कम एलबीटीमध्ये अधिक करून वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे.
सहकार एजन्सी प्रा. लि. या संस्थेकडे सध्या पथकर वसुलीचे कंत्राट आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी निविदा प्रक्रिया करून ठेवल्यास पालिकेला अडचण येणार नाही. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यात मनपा दप्तरी लगबग सुरू आहे.
यावर्षी पालिकेला २२ कोटी रुपयांमध्ये ठेका द्यायचा आहे. ३ कोटी रुपये पालिकेला नैसर्गिक वाढीनुसार हवे आहेत. २००६ पासून ३० जून २०११ पर्यंत सहकार एजन्सीकडे जकात वसुलीचा ठेका देण्यात आला होता. त्याच संस्थेला गेल्यावर्षी पथकर वसुलीचे कंत्राट देण्यात आले होते. १ आॅक्टोबर २०१३ ते ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत १७ कोटी २६ लाख रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित होते. १ कोटी ९४ लाख रुपये जास्तीचे देत १९ कोटी २६ लाख रुपयांत सहकारला कंत्राट देण्यात आले. १ आॅक्टोबर २०१४ ते ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत मनपाला २२ कोटी रुपयांचे उत्पन्न पथकर वसुलीतून हवे आहे.
राज्यात सर्वत्र वसुली
शासन दरबारी या प्रकरणी चर्चेच्या फैरी सुरू असून ३१ जुलैपूर्वी या प्रकरणात निर्णय होणार आहे. राज्यभरात सर्व मनपाहद्दींमध्ये पथकर वसूल केला जातो. १ हजार कोटी रुपयांच्या आसपास ते उत्पन्न आहे. व्यापारी संघटनांच्या मागणीवरून शासन त्याबाबत विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Movement of cancellation of recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.