अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

By Admin | Updated: July 23, 2014 00:26 IST2014-07-22T23:52:53+5:302014-07-23T00:26:05+5:30

परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़

Movement of Anganwadi Sevikas | अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये सेविका व मदतनिसांची लक्षणीय उपस्थिती होती़
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयसीडीएस योजनेचे नियमीतीकरण करून त्याचे रुपांतर मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत विभागात करावे, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, तसेच सेविकांना दरमहा १० हजार रुपये तर मदतनिसांना साडेसात हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे, केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या सेवाशर्ती ठरविण्यासाठी महिला व सबलीकरण समिती नेमली होती़ या समितीने आपला अहवाल १० आॅगस्ट २०११ पर्यंत लोकसभा व राज्यसभेत सादर केला होता़ या समितीमध्ये ३१ महिला खासदारांचा समावेश होता़
या शिफारशीची अंमलबजावणी केंद्र शासनाने तत्काळ करावी, अंगणवाड्या खाजगी संस्थांना हस्तांतरित करून नयेत, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनाने पेन्शन योजना लागू करावी, अनेक राज्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ केली आहे़ त्या धर्तीवर राज्य शासनाने मानधनात वाढ करावी, ग्रामीण व शहरी भागातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन नवीन अंगणवाड्यांच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी, सुसज्ज अंगणवाडी केंद्र बांधून द्यावीत, एक महिन्याची उन्हाळी सुटी द्यावी, आजारपणाची रजा द्यावी, टीएचआर तत्काळ बंद करावा, एनजीओ संस्थांकडे अंगणवाड्यांचे हस्तांतरण करू नये, अंगणवाड्यामध्ये खेळणी, गणवेश व अन्य सुविधा देण्यात याव्यात, संपकालीन पगार तत्काळ अद्यावा करावा, यासह आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़
(प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या स्थानिक मागण्या
परभणी शहरातील अंगणवाड्यांना तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मनपा प्रशासनाला देऊन सुसज्ज अंगणवाड्या बांधाव्यात़
नागरी भागातील बचत गटांचा पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यात यावा़
परभणी ग्रामीण प्रकल्पातील सेविका व मदतनिसांची टीए बिले २०१०-११ व २०१२-१३ ची थकित बिले अदा करावीत़
शासनाने दिलेल्या हरभऱ्याला कीड लागली असून, तो निकृष्ट दर्जाचा आहे़ त्यामुळे बालकांनी हरभरा खाल्ल्यानंतर तो पचन होत नाही़
तालुकास्तरावर पंचायत समिती स्तरावर अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बैठका घेण्यात येतात़ परंतु, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसते़ त्यामुळे महिलांची कुचंबणा होते़ अंगणवाडी सेविका स्वच्छतागृहाची सोय करावी़

Web Title: Movement of Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.