तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी
By Admin | Updated: August 2, 2016 00:27 IST2016-08-02T00:25:44+5:302016-08-02T00:27:48+5:30
औरंगाबाद : सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी
औरंगाबाद : सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. नकोशी असलेल्या पोटच्या मुलीचा तिच्या निर्दयी मातेने तोंडात बोळा कोंबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या मातेसह तिची प्रसूती करणाऱ्या दाईला अटक केली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे बेवारस अवस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मातेचा शोध घेण्यात सिडको पोलिसांना यश आले. तपास करणाऱ्या तरबेज पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले तर पोलिसांना मदत करणाऱ्या खबऱ्याला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
अर्भकाची आई बिस्मिल्लाबी वसीम खान (रा. मिसारवाडी, सिडको) आणि दाई शारजा शेख नबी (रा. हर्सूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. याविषयी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, सिडकोतील सनी सेंटरच्या मागे २१ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे एक नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळले होते. शवविच्छेदनामध्ये अर्भकाच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यासाठी शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या डॉक्टरांची बैठक घेऊन २० ते २१ जून रोजी त्यांच्या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांची यादी मागविली होती. तसेच शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स चालकांची बैठक घेऊन जून महिन्यात संभाव्य (पान ५ वर)
अशा प्रकरणात पोलिसांना प्रथमच यश...
अर्भकाचा खून करून प्रेत बेवारस अवस्थेत फेकण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, अशा गुन्ह्यातील मातेचा शोध घेण्यात पोलिसांना प्रथमच यश आले. त्यासाठी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेतला.
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, ज्ञानोबा मुंढे, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती, स.पो.नि. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडवी, पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांनी हा तपास पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा आयुक्तांनी केली.