माऊंट फ्रेंडशिप, सेव्हन सिस्टर मोहिमेसाठी आयसीएफचे गिर्यारोहक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:26 IST2019-05-01T01:25:48+5:302019-05-01T01:26:02+5:30
: इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अॅडव्हेनंचर स्पोटर््स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १५ मेदरम्यान माऊंट फ्रेंडशिप आणि माऊंट सेव्हन सिस्टर मोहिमेसाठी औरंगाबाद येथील गिर्यारोहक रवाना झाले आहेत. या मोहिमेचा आज विद्यापीठ परिसरात फ्लॅगआॅफ करण्यात आला. यावेळी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी सहभागी गिर्यारोहकांना शिखरावर चढताना व उतरताना तसेच तेथील वातावरणात येणाऱ्या अडचणीत कशी खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले.

माऊंट फ्रेंडशिप, सेव्हन सिस्टर मोहिमेसाठी आयसीएफचे गिर्यारोहक रवाना
औरंगाबाद : इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा अॅडव्हेनंचर स्पोटर््स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १५ मेदरम्यान माऊंट फ्रेंडशिप आणि माऊंट सेव्हन सिस्टर मोहिमेसाठी औरंगाबाद येथील गिर्यारोहक रवाना झाले आहेत.
या मोहिमेचा आज विद्यापीठ परिसरात फ्लॅगआॅफ करण्यात आला. यावेळी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी सहभागी गिर्यारोहकांना शिखरावर चढताना व उतरताना तसेच तेथील वातावरणात येणाऱ्या अडचणीत कशी खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभूलाल पटेल, नंदू पटेल, फुलचंद सलामपुरे, दयानंद कांबळे, सुनील कोळी, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. निलिशा अग्रवाल व सतीश पंडागळे यांनी मोहिमेत सहभागी होणाºया गिर्यारोहकांना शुभेच्छा दिल्या. विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत किशोर नावकर, राहुल अहिरे, सूरज सुलाने, शोएब पठाण, प्रशांत काळे, विनोद विभुते, कविता जाधव, आती चिल्लारे, रिया नरवडे, इशिता हिरवडे, प्रेरणा पंडागळे, श्रद्धा कोळी, अर्थ अग्रवाल सहभागी झाले आहेत.