सोमनाथ खताळ , बीड विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, पक्ष यांच्याकडून होणारा विरोध झुगारूनही ‘फे्रंडशिप डे’ आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, आईच्या प्रेमाची माहिती केवळ सोशल मिडीयापुरतीच मर्यादित झाल्याचेही दिसून आले. ‘आई म्हणजे एक नाव असतं... घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं...’ आईचे महात्म्य सांगणार्या या ओळीतून सर्वांना आईच्या विशाल रुपाचे दर्शन होते. अफाट, अगाध, अनंत वात्सल्याचा, पे्रमाचा आणि अवर्णनिय त्यागाचा ठेवा हृदयात जपणार्या ‘आई’बद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे. मात्र, ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने ही संधी आहे. रविवारी ‘मदर्स डे’ होता. मात्र, ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी विरोध पत्करणार्या; प्रसंगी जिवाचा आटापिटा करणार्या तरूणाईला मातृदिनाचे विस्मरण होताना दिसून आले. सोशल मीडियावर संदेशाची रेलचेल आईबद्दलची कृतज्ञता शब्दांत व्यक्त करणार्यासाठीही मुलांकडे वेळ नव्हता. पण सोशल मिडीयावर मात्र मातेबद्दलचे प्रेम दाखविणार्या संदेशांची रेलचेल दिसून आली. आईचे महात्म्य सांगणार्या संदेशांनी इनबॉक्स फुल्ल झाल्याचे पहावयास मिळाले. वृद्धाश्रमाची गरज कशाला? अलिकडच्या काळात वृद्धाश्रमामध्ये गर्दी वाढताना दिसून येत आहे. आयुष्याच्या सायंकाळी आई-वडीलांना आश्रमाची वाट दाखवणे उचित नाही. ‘मदर्स डे’ साजरा करताना केवळ औपचारिकता म्हणून पार पाडण्याऐवजी या संस्कार केंद्राचा नीट सांभाळ केला तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. हे शक्य झाले तरच मदर्स डे साजरा केल्याचे सार्थक होईल, अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी व्यक्त केली. अनुभवाचे बोल काय म्हणतात...? माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या जिवनातील प्रथम मार्गदर्शक ही आईच असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनातील यशाचे संपूर्ण श्रेय आईलाच द्यावे. अभ्यास न केल्यास माझ्यावर रागावणारी माझी आई वेळप्रसंगी शिक्षक झाली. तिच्या रागावण्यामागेही एकप्रकारे प्रेमाचा ओलावा होता. आज मी फक्त मातेमुळेच आहे. डॉ. संजय जानवळे यांनी आपले अनुभव सांगून जगातील सर्व मातांना आपला सलाम केला.
बीडमधील तरूणाईला पडला ‘मातृप्रेमा’ंचा विसर !
By admin | Updated: May 12, 2014 00:08 IST