शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चालू वर्षी सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या

बीड : सततच्या दुष्काळीस्थितीमुळे जगणेच कठीण होऊन बसलेले शेतकरी निराशेपोटी टोकाचे पाऊल उचलत आहेत़ मागील १४ वर्षांमध्ये कधीच झाल्या नव्हत्या इतक्या आत्महत्या यावर्षी झाल्या आहेत़ तब्बल ८६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले, त्यापैकी फक्त ५९ शेतकऱ्यांच्या कुटंबियांना मदत मिळाली़कवी सुरेश भट यांची एक कविता प्रसिद्ध आहे़ ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ अशा या हृदय हेलावून टाकणाऱ्या पंक्ती! इथे तर जगण्याने छळलेच आहे; परंतु मरणानंतरही दुर्दैव पाठ सोडायला तयार नाही़ मागील चौदा वर्षांतील शेतकरी आत्महत्येच्या तुलनेत यावर्षी झालेल्या आत्महत्यांचा आकडा अधिक आहे़ ८६ पैकी केवळ ५९ आत्महत्या पात्र ठरल्या असून त्या सर्वांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे़ आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाते; परंतु त्यासाठी पात्र- अपात्रतेच्या कसोटी पार करावी लागते़ शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यालाही पात्र- अपात्रतेत तोलले जाते़ पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा हात पुढे केला जातो़ कर्ता पुरुष गेल्यावर आयुष्यभर पांढरे कपाळ घेऊन मुलाबाळांसह जगणाऱ्या महिलांच्या हातावर लाख रुपये टेकविल्यावर सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही़ शेतकरी आत्महत्येचं मोल लाखभर रुपयांत होऊच शकत नाही़ आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट म्हणाले़ (प्रतिनिधी)