फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!
By Admin | Updated: May 7, 2017 00:18 IST2017-05-07T00:17:24+5:302017-05-07T00:18:00+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सुदृढ आरोग्यासाठी फळांचा वापर नित्याचा झाला आहे. मात्र गत काही वर्षांपासून फळे विषारी बनत आहेत. सृदढ आरोग्याऐवजी आजार वाढत आहेत. विशेषत: केळी, पपई, आंबे व अन्य फळ पिकविण्यासोबतच ती आकर्षक दिसावीत म्हणून रसायनांचा वापर केला जात आहे. फळ पिकविण्यासाठी विशेषत: कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येतो. याचा वापर ग्राहकांच्या जिवावरही बेतू शकतो.
या रसायनांचे फळांमध्ये उतररून त्याचे अपाय होत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सततच्या इथेलिन व कार्बाईडचा वापर केल्याने फळे खावीत की नाही, असा प्रश्न पडत आहेत. जालना शहरात सूरत, हैदराबाद, नाशिक, कोकण, नांदेड, सोलापूर इ. भागांतून केळी, आंबे तसेच इतर फळे येतात. आंबे, केळी आणि पपईसाठी औषधींचा वापर हमखास होतो.
फळे आकर्षक दिसण्यासाठीही औषधींचा वापर होतो. छुप्या पद्धतीने या रसायनांचा वापर होत असल्याने त्याची माहिती सामान्य माणसाला होत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे.
अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे म्हणाल्या, जालना शहरात जी फळे पिकविली जातात. त्यात कार्बाईडचा वापर आढळून आलेला नाही.
गत आठवड्यातच अशा फळांचे नमुने घेतले असून, फळ विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.