वाळूज महानगरातील मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:43 IST2018-11-25T22:42:40+5:302018-11-25T22:43:33+5:30
वाळूज महानगर: एमआयडीसीने महाराणा प्रताप चौक रुंदीकरणानंतर सुरु केलेले मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रविवारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

वाळूज महानगरातील मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर
वाळूज महानगर: एमआयडीसीने महाराणा प्रताप चौक रुंदीकरणानंतर सुरु केलेले मोरे चौक रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. रविवारी डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
बजाजनगरातील मुख्य चौक अरुंद असल्याने व चौकात अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना कायम वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे एमआयडीसीने येथील रस्त्याच्या कामाबरोबरच चौक रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे. येथील मोरे चौकात रुंदीकरणासह चारही बाजूने फुटपाथ उभारणे, भूमिगत गटार टाकणे व सुशोभिकरण करणाचे कामे प्रगतीपथावर सुरु आहेत.
रविवारी जागृत हनुमान मंदिर रस्त्याकडील बाजूचे डांबरीकरणाचे काम हाती घेवून कामाला सुरुवात करण्यात आली. डांबराच्या पहिला थर दिल्यानंतर त्यावर पुन्हा यंत्राच्या सहाय्याने खडी व डांबर टाकून लोलरच्या सहाय्याने मजबूतीकरण केले जात आहे. चौक रुंदीकरणाच्या कामानंतर सततच्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे.