शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

CoronaVirus: मराठवाड्यातील दीड हजारांहून अधिक गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:28 IST

गाव करील ते राव काय करील; कोरोनामुक्तीचे रोल मॉडेल ठरताहेत छोटी गावे

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : राज्यात एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि वाढत्या मृत्युंमुळे भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे काही गावांनी कोरोनाला आपल्या हद्दीत शिरकावही करू दिलेला नाही. मराठवाड्यातील तब्बल दीड हजारांहून अधिक गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले. ग्रामस्थांच्या निश्चयाने कोरोनामुक्तीचा आदर्श निर्माण केला.

नियमांचे काटेकोर पालन  औरंगाबाद : इतर गावांतील नागरिकांना गावबंदी, मास्कचा वापर, शारीरिक अंतर, चाचण्यांवर भर यासारख्या उपाययोजनांची कटाक्षाने अंमलबजावणी करत जिल्ह्यातील ३०८ गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव हे त्याचे एक उदाहरण. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा नामोनिशाणही नाही. मास्क लावल्याशिवाय गावातील एकही नागरिक घराबाहेर पडत नाही. गावातील सर्व वयोवृद्धांचे लसीकरणही पूर्ण झालेले आहे.  

कडेकोट देखरेख हिंगोली : जिल्ह्यातील ७११ पैकी जवळपास २७० गावांमध्ये अजूनही कोरोनाचा स्पर्शही झालेला नाही. यात दुर्गम अथवा लहान गावांचाच प्रामुख्याने जास्त समावेश आहे. वसमत तालुक्यातील डोणवाडा हे गाव त्यापैकीच एक. डोणवाडा येथे गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना, देखरेख कायम आहे. त्यामुळे गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.  

कोरोनामुक्तीचा आदर्श परभणी : जिल्ह्यातील ८०४ पैकी २२६ गावांत कोरोनाचा शिरकाव अजूनही झालेला नाही. पाथरी तालुक्यातील बाणेगाव, वरखेड, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा या काही गावांनी आदर्श निर्माण केला आहे. गोदावरी तांडा येथील सरपंच सरुबाई चव्हाण यांनी सांगितले, बाहेरगावाहून आलेल्या एकाही नागरिकाला विना तपासणी गावात प्रवेश दिला नाही. ग्रामस्थांनी कोरोना रोखण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे हे शक्य झाले. 

जनजागृतीवर दिला भरउस्मानाबाद : जिल्ह्यातील ७३३ पैकी १२७ गावांनी अढळ प्रयत्नांनी कोरोनाला रोखले आहे. यातील जायफळ हे एक उदाहरण. येथे प्रामुख्याने जनजागृतीवर भर दिला आहे. हॉटस्पॉट भागातून एखादा व्यक्ती आल्यास ग्रामस्थ त्याची कल्पना प्रशासनाला देतात. 

गावसीमेवर युवकांची फौज नांदेड : कोरोनाला दूर ठेवणाऱ्या २२८ गावांपैकी हदगाव तालुक्यातील कणकवाडीने आदर्शच घालून दिला आहे. पाचशे लोकवस्तीच्या या गावात अद्यापपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. कणकवाडी ग्रामस्थांनी युवकांची समितीच गावसीमेवर तैनात केली आहे. 

ग्रामपंचायतींची करडी नजर जालना : जिल्ह्यातील ९६४ गावांपैकी १५४ गावांमध्ये अद्याप कोरानाने शिरकाव केलेला नाही. भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील सरपंच छाया रामलाल चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाहेर गावांहून येणाऱ्यावर करडी नजर ठेवली. 

त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी लातूर : जिल्ह्यात पहिला रुग्ण ७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. तेव्हापासून बाहेरगावी गेलेले परत आल्यानंतर किमान पाच ते सहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन तपासणी करते. 

गाव सुरक्षेला प्राधान्य  बीड : कोविड साथ सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात ११८ गावांमध्ये एकही रूग्ण आढळून आला नाही. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी ही किमया केली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या