दूषित अन्न सेवनामुळे दोनशेहून अधिक आजार
By Admin | Updated: April 7, 2015 01:22 IST2015-04-07T00:42:25+5:302015-04-07T01:22:32+5:30
लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत

दूषित अन्न सेवनामुळे दोनशेहून अधिक आजार
लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत’ हे घोषवाक्य निर्धारीत करुन जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, २०० हून अधिक आजार दूषित अन्न सेवनामुळेच होतात, असे मत लातूरच्या डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सोमवारी व्यक्त केले.
याबाबत डॉक्टर व्ही़एम़व्होळंबे यांच्याशी संपर्क साधला असता, अन्न सुरक्षेअभावी अनेक आजार उद्भवतात, ही चिंतेची बाब आहे़ ०२ दसलक्ष मृत्यू हे अतिसारामुळे होतात़ तसेच बहुतांशी हे आजार दुषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे होतात़ ही बाब लक्षात घेऊन सुरक्षीत अन्न थेट शेतापासून ताटापर्यंत या घोषवाक्यानुसार सुरक्षित अन्न सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़ तसेच स्वयंपाक घरातील स्वच्छता, स्वयंपाकाची जागा, स्वयंपाक घरातील कपडे, भांडी यांची स्वच्छता, स्वच्छ पाण्याचा वापर याची काळजी घेऊन झुरळ, उंदीर याचा वावर टाळावा, तसेच बाहेरील पदार्थाचे सेवन टाळावे, देशातील अन्नाची सुरक्षीतता थेट शेतापासून ताटापर्यंत पाळली तरी अन्नामुळे होणारे आजार कमी होतील़ मृत्यूची संख्याही घटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ अन्न सुरक्षा बाबत जनजागृती करुन भेसळविरहीत अन्न उपलब्ध करावे़ दुषीत अन्नामुळे आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे याबाबत जनजागृती करुन सुरक्षीत अन्न घ्यावे, असे डॉ़ सचिन बालकुंदे म्हणाले़ सुरक्षीत अन्न याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे़ देवर्जनला याबाबत जनजागृतीचा कार्यक्रम होत आहे़ साधारणपणे अन्न, पाणी, हवा, डास, माशा व घानीचे साम्राज्य आदीमुळे आजार वाढतात, हे टाळणे आपल्या हाती आहे़ उत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडूलकरने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली़ त्याच पद्धतीने अन्न सुरक्षीततेबाबतही जनजागृती करुन अन्न सुरक्षीततेला गती द्यावी, असे मत डॉ़ सुधीर बनशेळकीकर यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)