शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चा

By admin | Updated: July 31, 2014 00:45 IST

घनसावंगी : अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी घनसावंगी तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वाजवित मोर्चा काढला.

घनसावंगी : अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी घनसावंगी तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्य वाजवित घोंगडी खांद्यावर घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.धनगर समाजास अनुसूचित जातीचे आरक्षण दिलेले आहेत. मात्र धनगर आणि धनगड या र आणि ड च्या घोळामुळे अद्यापपर्यंत समाजाला या आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे. आता धनगर समाजाला दिलेल्या या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात धनगर समाज एस.टी आरक्षण कृती समितीचे अ‍ॅड. कैलास जारे, अशोक सोमवारे, अ‍ॅड. विशाल पांढरे, सोपान डोईफोडे, भाऊसाहेब बरेगळ, बालाजी केसकर, माणिक राऊत, अर्जुन डोईफोडे, अ‍ॅड. अशोक तारडे, राम लांडे, अप्पासाहेब वैराळ, सखाराम नाईक, प्रल्हाद नाईक, विठ्ठल मापारी, सुदाम मापारी, बाळासाहेब तार्डे, अशोक लांडे, विलास लांडे, बाबूराव खरात, डॉ.एल. डी. भोजने, अ‍ॅड.लक्ष्मण गायके, प्रमोद तार्डे, डॉ.गंगाधर पांढरे अ‍ॅड.रामेश्वर गायके, अ‍ॅड.वैभव खटके, अ‍ॅड.रामेश्वर गावडे, भगवानराव डोईफोडे, सोपानराव डोईफोडे, दीपक पांढरे, जय खरात, संजय बेवले, संतोष खरात, जीवन वगरे, शिवाजी थेटे, बाबासाहेब आटोळे, बाळू तेसकर यांच्यासह अंबड व घनसावंगी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अंमलबजावणीच्या मागणीसाठी यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला होता. (वार्ताहर)