शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पैशाअभावी मुलाची मृत्यूशी झुंज!

By admin | Updated: September 17, 2014 01:16 IST

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका छोट्याशा कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या एका कामगाराच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाल्याने तो मृत्यूशी झंूज देत आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीमध्ये एका छोट्याशा कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या एका कामगाराच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाल्याने तो मृत्यूशी झंूज देत आहे. त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १२ लाख ७० हजार रुपये खर्च सांगितला आहे. त्यामुळे कामगार कुटुंबाच्या पायाखालची वाळूच घसरली आहे.बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनीत राहणारे सुशील सरदेशपांडे यांना दोन अपत्ये आहेत. मोठा मुलगा सुमित (१३) स.भु. प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये शिकतो. लहान मुलगी (९) इयत्ता चौथीत शिकत आहे. छोट्याशा नोकरीत सरदेशपांडे कुटुंब आनंदाने जगत असताना २८ आॅगस्ट रोजी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली. सुमित शाळेत खेळत असताना अचानक बेशुद्ध झाला. शिक्षिका उपाध्याय यांनी त्याचे वडील सुशील सरदेशपांडे यांना फोन लावला अन् सांगितले की, तुमचा मुलगा कसातरीच करतोय! तेव्हा त्यांनी मी पुण्यात आहे. चक्कर आली असेल, असे सांगून फोन ठेवला. पुन्हा उपाध्याय यांनी फोन केला की, तुमचा मुलगा गंभीर आहे. मग त्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेण्याची विनंती केली. शाळेच्या शिक्षकांनी सुमितला साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर त्याला एमजीएममध्ये हलविण्यात आले. तेथेही औषधोपचार होत नसल्याने सिग्मा हॉस्पिटलला नेण्यात आले. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. त्याच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून, भविष्यात पुन्हा रक्तस्राव होऊ नये म्हणून युरोपमधून काही औषधे मागवायची आहेत. त्यासाठी डॉक्टरांनी १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च सांगितला आहे. सुमित सध्या घरी असून, वडिलांनी मोठ्या मुश्किलीने २ लाख ७० हजार रुपये खर्च केले आहेत. शहरातील दानशूर मंडळींनी त्याच्या उपचारासाठी आर्थिक साह्य करावे, असे आवाहन त्याच्या वडिलांनी केले आहे. दानशूर मंडळींनी सिग्मा हॉस्पिटल येथे सुमित सरदेशपांडे या नावाने आर्थिक साह्य जमा करावे.