मनी पेज/सिंगला

By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:57+5:302020-12-04T04:09:57+5:30

नवी दिल्ली : अमेरिकेतील जगप्रसिद्ध खाद्य ब्रॅण्ड ‘पिझ्झा हट’चे सहसंस्थापक फ्रँक कार्नी यांचे बुधवारी वयाच्या ८२व्या वर्षी न्यूमोनियामुळे निधन ...

Money Page / Single | मनी पेज/सिंगला

मनी पेज/सिंगला

नवी दिल्ली : अमेरिकेतील जगप्रसिद्ध खाद्य ब्रॅण्ड ‘पिझ्झा हट’चे सहसंस्थापक फ्रँक कार्नी यांचे बुधवारी वयाच्या ८२व्या वर्षी न्यूमोनियामुळे निधन झाले. अमेरिकेतील विचिटा शहरात आपला भाऊ डॅनसोबत १९५८ साली त्यांनी पिझ्झा हटची सुरुवात केली होती. ते नुकतेच कोरोनातून बरे झाले होते. ते एक दशकापासून अल्झमायर्स या आजाराने ग्रस्त होते. १९७७ मध्ये पेप्सिकोने ३० कोटी डॉलरमध्ये पिझ्झा हट विकत घेतले होते.

.....................

सेन्सेक्स, निफ्टी

वाढीसह बंद

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक गुरुवारी अल्पवाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १४.६१ अंकांनी वाढून ४४,६३२.६५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २०.१५ अंकांच्या वाढीसह १३,१३३.९० अंकांवर बंद झाला. मारुती, ओएनजीसी, एशियन पेंट्स, एनटीपीसी, एसबीआय, बजाज फिन्सर्व्ह आणि टाटा स्टील यांचे समभाग वाढले. याउलट एचडीएफसी बँक, टीसीएस, बजाज ऑटो, इन्फोसिस आणि एम ॲण्ड एम यांचे समभाग घसरले.

...................

रुपया घसरला

१२ पैशांनी

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्यामुळे गुरुवारी आंतरबँक विदेशी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरला. त्याबरोबर एक डॉलरची किंमत ७३.९३ रुपये झाली. पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली असून, शुक्रवारी समिती आपला निर्णय जाहीर करणार आहे. समितीचा काय निर्णय होतो, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे चलनविनिमय बाजार अस्थिर राहिला. रुपयात तीव्र चढ-उतार पाहायला मिळाले.

..................

सोन्याच्या दरात

४८१ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ४८१ रुपयांनी वाढून ४८,८८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भाव ५५५ रुपयांनी वाढून ६३,५०२ रुपये किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढून १,८४१ डॉलर प्रतिऔंस झाले. चांदीचा दर मात्र २४.१६ डॉलर प्रतिऔंस असा स्थिर जवळपास राहिला.

...................

Web Title: Money Page / Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.