मनी पेज/रोजगार
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:18+5:302020-12-04T04:12:18+5:30
नवी दिल्ली : भारतीय सेवा क्षेत्रातील व्यवसायांत मोठी वाढ झाल्यामुळे नऊ महिन्यांत प्रथमच रोजगारात वाढ झाली आहे. कोविड-१९ साथीमुळे ...

मनी पेज/रोजगार
नवी दिल्ली : भारतीय सेवा क्षेत्रातील व्यवसायांत मोठी वाढ झाल्यामुळे नऊ महिन्यांत प्रथमच रोजगारात वाढ झाली आहे. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून देश बाहेर येत असल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘भारतीय सेवा व्यवसाय घडामोडी निर्देशांक’ नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात ५० अंकांच्या वर राहिला आहे.
रॉकफेलर फाउण्डेशनची उपकंपनी ‘स्मार्ट पॉवर इंडिया’ने (एसपीआय) हे सर्वेक्षण जारी केले आहे. ऑक्टोबरमध्ये ५४.१ अंकांवर असलेला निर्देशांक नोव्हेंबरमध्ये अल्पप्रमाणात घसरून ५३.७ अंकांवर आला. तरीही हे आकडे जोरदार वृद्धी आणि चांगली मागणी दर्शवित आहेत. कोविड-१९ साथीचे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर व्यवसाय वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आयएचएस मार्किटच्या आर्थिक सहायक संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे मार्च ते सप्टेंबर या काळात झालेल्या घसरणीतून भारतीय सेवा क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांच्या नव्या कामांत वाढ झालेली आहे. त्यानुसार व्यावसायिक घडामोडी आणि रोजगार वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये कंपन्यांनी अतिरिक्त मनुष्यबळाची भरती केली. त्याबरोबर सलग आठ महिन्यांत दिसून आलेल्या रोजगारातील कपातीला ब्रेक लागला आहे. रोजगारवाढीचा एकूण दर अल्प असला तरी वाढ महत्त्वाची आहे. काही कंपन्यांकडे आधीच पुरेसे मनुष्यबळ असल्यामुळे रोजगारातील वाढ कमी दिसत आहे.
............................