मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव क्षणिक गोष्टी
By Admin | Updated: July 19, 2014 00:43 IST2014-07-18T23:47:25+5:302014-07-19T00:43:52+5:30
जालना : मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव या सर्व क्षणिक गोष्टी आहेत. तुमचे बोलणे कसे आहे, यावरुन तुमची प्रगती आणि अधोगती ठरते, तुमचे बोलणे चांगले तर जग चांगले, असे प्रतिपादन

मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव क्षणिक गोष्टी
जालना : मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव या सर्व क्षणिक गोष्टी आहेत. तुमचे बोलणे कसे आहे, यावरुन तुमची प्रगती आणि अधोगती ठरते, तुमचे बोलणे चांगले तर जग चांगले, असे प्रतिपादन प. पू. गौरवमुनी म. सा. यांनी केले. ते जालना स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे आयोजित चातुर्मास प्रसंगी बोलत होते. जीवनात जिव्हा (जिभे) ला मोठे महत्व असून बोलण्याचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. यात एक विचार करुन बोलणे, दुसरा बोलताना विचार करणे आणि तिसरा बोलल्यावर विचार करणे.
यात आपण कुठे आहोत याचे आत्म परीक्षण करावे आणि आपण कशात हवे हे ठरवा, असे पू. गौरवमुनी म. सा. यांनी सांगितले.
वायफळ भांडणे निर्माण होतील, कोणाचे नुकसान होईल किंवा कोणी दुखावले जाईल असे बोलणे टाळावे, असे सांगून मुनीश्री म्हणाले की, भांडणातून वाद होताच, आरोग्य खराब होते, सुख-शांती बिघडते, असे सांगून ते म्हणाले की, मनुष्याने पोलिस ठाणे, कोर्ट आणि दवाखाना या तीन पायऱ्या कधीही चढू नये. या पायऱ्या चढल्या तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होते.
अदालत या शब्दाचा अर्थ सांगताना प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांनी अ-आईये-, दा-दालीये (पैसे, वेळ, प्रतिष्ठा), ल-लढीये (आपसात खरे-खोटे करा), त-तबाह हो जाईये, असा अर्थ सांगत अदालतीची वेळ आपले बोलणे चांगले असेल तर येणार नाही.
डॉक्टरची पायरी ही आपले जीवन पध्दती, शरीर स्वास्थ्यासाठी वेळ न दिल्याने चढावी लागते. तर पोलिस ठाण्याची पायरी ही कोणाच्या तरी वादात बोलणे, विचार करुन न बोलणे यामुळे चढावी लागते. चांगले काम करायला आज आपल्याकडे वेळच नसल्याचे सांगत अनेकांना चांगली आवड असते; परंतु सवड नसते. त्यांनी आवड जपण्यासाठी सवड काढावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जेव्हा एखादे स्थळ (मुलगी) बघायला गेल्यावर आपण तिला किती शिक्षण झाले, काय काय येते, हे येते का, ते येते का, हे विचारतो; परंतु वास्तवात आपण तिला रामायण्थडा कशामुळे घडले किंवा साधु संतांविषयी विचारावे, त्यांची साधना, त्याग, कार्य याविषयी विचारावे. यामुळे आजचे शिक्षण जसे जरुरी आहे तसेच इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे. मागच्या इतिहासाच्या घटनेतून बरेच काही शिकण्यासारखे असते आणि यातून सुधारणा होत असल्याचे प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांनी सांगितले.