शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

रेल्वेने पैसे तर बसने वेळ वाचणार; तुम्ही कसे जाणार पुण्याला ? नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता दररोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 12:21 IST

आजपासून दररोज रेल्वे: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ४ वाजता जालना रेल्वेस्टेशनवर नांदेड-पुणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त औरंगाबादहून पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजपर्यंत प्रवासासाठी एसटी बस आणि ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांचा अधिक ओढा आहे. मात्र आता सोमवारपासून पुण्यासाठी दररोज रेल्वे धावणार आहे. रात्री प्रवास करून पहाटे पुण्याला पोहोचणे शक्य होणार आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि किफायतशीर म्हटला जातो; पण यापुढे वेळ आणि पैशांचे गणित सोडवून प्रवाशांना पुण्याचा प्रवास रेल्वेने करायचा की बसने, हे ठरवावे लागणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ४ वाजता जालना रेल्वेस्टेशनवर नांदेड-पुणे एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार आहे. नांदेड - हडपसर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा विस्तार पुण्यापर्यंत करण्यात आला असून, या रेल्वेची वेळही बदलण्यात आली आहे. ही रेल्वे राेज धावणार आहे. बहुतांश ट्रॅव्हल्स रात्री धावतात. त्यामुळे या रेल्वेचा ट्रॅव्हल्सवर परिणाम होण्याची चिंता ट्रॅव्हल्सचालकांना सतावत आहे.

नांदेड - पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रात्री ८.२० वाजता येईल. रात्री ८.२५ वाजता ही रेल्वे रवाना होईल आणि पुण्याला पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. पुणे - नांदेड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहाटे ५.०५ वाजता येईल आणि ५.१० वाजता नांदेडकडे रवाना होईल. या रेल्वेला १५ बोगी असतील.

ट्रॅव्हल्सचे दर कमी होतीलट्रॅव्हल्स बसने ५ तासात पुण्याला जाता येते. रेल्वेने अधिक वेळ जातो. ९० टक्के ट्रॅव्हल्स या रात्रीच धावतात. नव्या रेल्वेमुळे ट्रॅव्हल्सचे तिकीट दर कमी होऊ शकतील.- राजन हौजवाला, अध्यक्ष, बस ओनर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट वेलफेअर असोसिएशन

पुणे मार्गावरील बस, ट्रॅव्हल्सची संख्या:ट्रॅव्हल्स-४७मध्यवर्ती बसस्थानकातून धावणाऱ्या बस- ३६पुणे विभागाच्या बसफेऱ्या-३६शिवनेरी बस-६

तिकीट दर किती ? ट्रॅव्हल्सचे तिकीट दर - ५०० ते ८०० रुपयेरेल्वेचे तिकीट दर- स्लीपर २६५ रुपये, थर्ड एसी ७०५ रुपये, सेकंड एसी १ हजार रुपये, फर्स्ट एसी १ हजार ६७५ रुपये.

पुण्याला जाण्यास लागणारा वेळ:बसने लागणारा वेळ- किमान ५ तास. (पुण्यातील वाहतूक कोंडीने अनेकदा वेळ वाढतो)रेल्वेने लागणारा वेळ- ९ तास

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटनstate transportएसटी