‘तौडा कुत्ता टॉमी’वर मोनालिसाचा कमाल डान्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:56+5:302020-12-29T04:05:56+5:30
आपल्या अदांनी घायाळ करणारी मोनालिसा ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील ...

‘तौडा कुत्ता टॉमी’वर मोनालिसाचा कमाल डान्स
आपल्या अदांनी घायाळ करणारी मोनालिसा ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने यशराज मुखातेच्या “तौडा कुत्ता टॉमी सड्डा कुत्ता कुत्ता” या रोस्टेड गाण्यावर डान्स केला. या व्हिडीओमधील तिचे हावभाव पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यशराजच्या गाण्यासोबत तिचा व्हिडीओसुद्धा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चनच्या नातीचे अफेअर ?
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नाव्या नंदा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. नाव्याने आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं असून यामुळे तिच्या फोटोंची चर्चा सुरु आहे. नाव्याने इन्स्टाग्रामवर घरांच्या कौलावर बसलेला एक फोटो शेअर केला आणि ती ट्रेंडमध्ये आली. या फोटोवर मिझान जाफरी याने कमेंट केली असून चेहरा दाखवू शकतेस का? असा प्रश्न विचारला आहे. मिझानने या कमेंटसोबत हार्ट इमोजीपण टाकली आहे. यामुळे आता त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.