महिलेचा विनयभंग, घरावर दगडफेक
By Admin | Updated: May 12, 2014 00:07 IST2014-05-11T23:28:37+5:302014-05-12T00:07:23+5:30
नळदुर्ग: उरूसात आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणाचा जाब विचारल्याच्या करणावरून तिच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी चौघाविरूध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

महिलेचा विनयभंग, घरावर दगडफेक
नळदुर्ग: उरूसात आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणाचा जाब विचारल्याच्या करणावरून तिच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी चौघाविरूध्द नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना रविवारी दुपारी व एक महिन्यापूर्वी निलेगाव येथे व शिवारात घडली़ पोलिसांनी सांगितले की, नळदुर्ग येथील सद्दाम पटेल या इसमाने एक महिन्यापूर्वी निलेगाव नजीकच्या हन्नूर मार्गावर एका महिलेचा मोबाईल नंबर मागत तिचा विनयभंग केला होता़ ती महिला रविवारी दुपारी निलेगाव येथील उरूसात आली असता सद्दाम याने पाठीमागून तिला खडे मारत तिची छेड काढली़ ही घटना महिलेने आपल्या नातेवाईकांना सांगितली़ नातेवाईकांनी सद्दाम यास जाब विचारला असता त्याचा राग मनात धरून सद्दाम पटेल, अखलाक करीम सगरी, जावेद गुड्डू पटेल व मोहसीन महैबूब सगरी यांनी त्या महिलेच्या घरावर दगडफेक केली़ या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपोनि पी़बी़ पाटील हे करीत आहेत़ (वार्ताहर)