तरूणीचा विनयभंग; तिघांविरूद्ध गुन्हा
By Admin | Updated: May 17, 2014 01:06 IST2014-05-17T01:01:46+5:302014-05-17T01:06:22+5:30
नवीन नांदेड :विष्णूपुरी येथून जवळच असलेल्या पांगरी येथील एका १८ वर्षीय तरूणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून जीवे मारण्याचीही धमकी दिल्या

तरूणीचा विनयभंग; तिघांविरूद्ध गुन्हा
नवीन नांदेड :विष्णूपुरी येथून जवळच असलेल्या पांगरी येथील एका १८ वर्षीय तरूणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून जीवे मारण्याचीही धमकी दिल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीआधारे, ‘पांगरी’ येथील महाविद्यालयीन तरूणी १५ मे रोजी दुपारी दोन वाजता तिच्या घरी थांबली होती. दरम्यान, गावातील सुभाष गंगाराम हनवते, संदीप हनवते व अन्य एक अनोळखी तरूण ‘त्या’ तरूणीच्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश केले. त्याचवेळी मुख्य आरोपी सुभाष हनवते याने ‘त्या’ तरूणीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. ‘तो’ एवढयावरच थांबला नाही, तर तो आणि संदीप हनवते याने आपल्या दोन्हीही हाताचे दंड वाईट हेतूने पकडून विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्या तरूणीने दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचे ठाणे अंमलदार यादव जांभळीकर व पो. उप नि. किशन राख यांनी सांगितले. याप्रकरणी ‘त्या’ तरूणीने दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात उपरोक्त ३ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेश वाघमारे हे तपास करीत आहेत. ( वार्ताहर )