मोदी आज बीडमध्ये
By Admin | Updated: October 3, 2014 23:57 IST2014-10-03T23:57:02+5:302014-10-03T23:57:02+5:30
बीड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बीडला येत आहेत़ त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे़

मोदी आज बीडमध्ये
बीड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत़ पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच बीडला येत आहेत़ त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे़
बीड लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार डॉ़ प्रीतम गोपीनाथ मुंडे, तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे, बीडमधील आ़ विनायक मेटे, गेवराईचे अॅड़ लक्ष्मण पवार, आष्टीचे भीमराव धोंडे, केजच्या प्रा़ संगीता ठोंबरे तर माजलगावचे आऱ टी़ देशमुख यांच्या प्रचारार्थ येथील धानोरा रोड भागातील भव्य प्रांगणात सभा होईल़ हवाई दलाच्या विशेष सुरक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने दुपारी ३़२५ वाजता बीडमध्ये आगमन होणार आहे़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे़ तेथून कारने ते सभास्थळी पोहोचतील़
धानोरा रोड परिसरात कडेकोट बंदोबस्तात त्यांची ५१ मिनिटांची सभा पार पडणार आहे़ डी आकाराचे व्यासपीठ बनविले आहे़ व्यासपीठावर मोजक्याच नेत्यांना स्थान राहील़
तीन हजार पोलिसांचा फौजफाटा
औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक अमितेश कुमार गुरूवारपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत़ ते सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी स्वत: लक्ष ठेवून आहेत़ शुक्रवारी दुपारी त्यांनी पत्रकारांना सांगितले, सभेला दुपारी ३़२५ वाजता सुरूवात होणार आहे़ खबरदारी म्हणून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ राखीव पोलीस दल, राज्य सुरक्षा बल, दंगल नियंत्रण पथक तैनात राहणार आहे़ शिवाय वरिष्ठ अधिकारीही ठिकठिकाणी बंदोबस्ताला राहणार आहेत़ तीन हजार पोलिसांची कुमक या कामी नेमली आहे़ सभास्थळी लवकर येणे शक्यतो टाळावे़ उन्हाची तीव्रता पाहता ही खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ सभास्थळी मोबाईल, बॅग आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़
वाहतूक व्यवस्थेत बदल
अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले, शनिवारी वाहतूक व्यवस्थेत बदल आहे़ धुळे-सोलापूर महामार्गावरील जड वाहतूक गढीहून माजलगावकडे तर मांजरसुंब्याहून पाटोद्याकडे वळविली आहे़ नगर रोड ते पालवण चौक, अंकुशनगर ते पोलीस मुख्यालय रस्ता बंद राहणार आहे़
गेवराईकडून येणाऱ्यांना शिंदेनगर, परळीहून येणाऱ्यांना पालवण रोड तर आष्टीहून येणाऱ्यांना नगर रोडवर पार्किंग व्यवस्था राहील़ (प्रतिनिधी)