शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला अखेर परवानगी मिळाली; पोलिसांनी घातल्या १६ अटी, काय म्हटलं पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 21:05 IST

पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. 

औरंगाबाद- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.

मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केलीय आणि पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केलाय. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात आली आहे. सभेदरम्यान, वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कोणाही करणार नाही याची आयोजन आणि वक्त्यांनी दक्षता घ्यावी, असही अटीमध्ये म्हटलं आहे. पण राज ठाकरे ही नोटीस स्वीकारणार का आणि त्यातल्या अटी मान्य करणार का याबाबत आता उत्सुकता आहे.

राज ठाकरेंच्या सभेला थेट अयोध्येतून हिंदुत्ववादी संघटनांचे अडीच हजार कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी येणार आहे. अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. या संघटनांचे जवळपास अडीच हजार कार्यकर्ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. सभेची पूर्णपणे तयारी आम्ही करणार आहोत. स्टेजचं काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. 

राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात आज बैठक

औरंगाबाद शहरातील कलश मंगल कार्यालयात आज मनसे नेत्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला मनसेचे जवळपास ४०० पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या सभे संदर्भातील नियोजन या बैठकीत केलं जाणार आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस