समलैंगिक संबंधास नकार दिल्यानेच केला मित्राचा खून
By Admin | Updated: May 8, 2016 01:04 IST2016-05-08T00:58:50+5:302016-05-08T01:04:52+5:30
औरंगाबाद : हाता-पायाच्या नसा कापून गुरुवारी (दि.५) दुपारी एका अल्पवयीन तरुणाने शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) या मित्राचा निर्घृण खून केला होता.

समलैंगिक संबंधास नकार दिल्यानेच केला मित्राचा खून
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला १० ते ३० टक्के व्याजाने कर्जपुरवठा करणाऱ्या बारा खासगी सावकारांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी शनिवारी फेटाळला.
दरम्यान, सावकारांच्या वकिलांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मंजुरी मिळावी. उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत आरोपींना अटक करू नये, असा विनंती अर्ज केला. त्यास न्यायाधीश वेदपाठक यांनी मंजुरी देत दि. १९ मे पर्यंत सावकारांना अटक करू नये, असे आदेश पोलिसांना दिले. कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश व महत्त्वाचे दस्तऐवज सावकारांच्या घरी सापडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याने सावकारांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
अमोल पवार याला १० ते ३० टक्के व्याजाने कर्जपुरवठा करणाऱ्या बारा संशयित सावकारांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायाधीश वेदपाठक यांच्या दालनात दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला. संशयित सावकार पांडुरंग अण्णासो पाटील, प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, जयसिंग बाबूराव जाधव, नीलेश जयसिंग जाधव, रणजित अशोक चव्हाण, विकास कृष्णात खोत, बिपीन ओमकार परमाळ, अशोक बाबूराव तनवाणी, मोनिका प्रशांत सावंत, प्रशांत शिवाजीराव सावंत, प्रफुल्ल अण्णासाो शिराळे, आदींना जामीन मंजूर करण्यासाठी जिल्ह्यातील सात नामवंत वकिलांनी कंबर कसली होती. सावकारांचा जामीन नामंजूर करावा यासाठी सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी सुरुवातीपासून अभ्यासपूर्ण व पुरावेसदृश युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सावकारांचे वकील, सरकारी वकिलांत जोरदार खडाजंगी झाली होती. शनिवारी अर्जावर निर्णय असल्याने सकाळी अकरापासून सर्व सावकार न्यायालयात बसून होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायाधीश वेदपाठक यांनी अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे सांगताच सावकारांसह आरोपींच्या वकिलांना घाम फुटला. सावकारांना अटक होऊ नये तसेच मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती यावेळी सावकारांच्या वकिलांनी केली. त्यास न्यायाधीश वेदपाठक यांनी मंजुरी दिली. यावेळी पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, आरोपीचे वकील धनंजय पठाडे, चंद्रकांत बुधले, पीटर बारदेस्कर, विराज नलवडे, विवेक शुक्ल, विद्याधर पाटील, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. संशयित सावकारांना अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे समजताच अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयाच्या पाठीमागील दरवाजातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिस त्यांच्या पाळतीवर होते. अटक होणार नाही असे समजताच पुन्हा ते न्यायालयाच्या बाहेर येऊन रुबाब ठोकू लागले. (प्रतिनिधी)