शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Mission Admission: 'कृषी' प्रवेशासाठी २७ हजार विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

By योगेश पायघन | Updated: October 13, 2022 20:24 IST

१७ ऑक्टोबर रोजी होईल पहिल्या फेरीसाठी जागा वाटप

औरंगाबाद : कृषी आणि संलग्न कृषी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. राज्यात नऊ अभ्यासक्रमांसाठी अनुदानित ३,३८०, विनाअनुदानित १३,२४० जागांसाठी २८ हजार २८० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ११२५ जणांचे आक्षेप नाकारण्यात आले. तर अंतिम गुणवत्ता यादीत २७ हजार १६७ विद्यार्थ्यांच्या जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीसाठी जागा वाटप १७ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. त्यासाठी रिपोर्टिंगचा कालावधी १८ ते २० ऑक्टोबर असेल.

सुधारीत वेळापत्रकानुसार, दुसऱ्या फेरीचे जागा वाटप २३ ऑक्टोबर रोजी, रिपोर्टिंग २७ ते २९ ऑक्टोबर, तिसऱ्या फेरीचे जागा वाटप ३ नोव्हेंबर, रिपोर्टिंग कालावधी ४ ते ८ नोव्हेंबर असेल. ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीत जागा निश्चिती झालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयात ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान उपस्थित राहून कागदपत्रे, आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादीतील गुणवत्तेनुसार १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान प्रवेश फेरी होईल. दरम्यान, १४ नोव्हेंबर पासून नियमित वर्ग शिकवणीला सुरूवात होईल.

७,३१५ आक्षेपांचे निराकरणऑनलाइन आक्षेपासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. त्यात ८ हजार ४४२ आक्षेप सीईटी सेलकडे दाखल झाले होते. त्यापैकी ७,३१५ आक्षेपांचे निराकरण करण्यात आले. तर तर ११२५ आक्षेप नाकारण्यात आले. ती यादीही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

अनुदानित ३,३८०, विनाअनुदानित १३,२४० जागाराज्यात नऊ अभ्यासक्रमांच्या ३३८० अनुदानित जागा आहेत, तर विनाअनुदानित सहा अभ्यासक्रमांच्या १३ हजार २४० जागा आहेत. चार कृषी विद्यापीठ अंतर्गत ही महाविद्यालये कार्यरत आहेत. सर्वाधिक ७४ महाविद्यालयात बी. एस्सी. ऑनर्स कृषी या अभ्यासक्रमाच्या ७,८९० जागा ७४ महाविद्यालयात आहेत. तर बी. टेक. जैवतंत्रज्ञान १६ काॅलेजमध्ये १२५० जागा, बी. टेक. अन्नशास्त्र २४ काॅलेजमध्ये १४८० जागा असून १० काॅलेजमध्ये बी.एस्सी. उद्यान विद्याच्या ८४० जागा, बी. एस्सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या १२ महाविद्यालयांत ९०० जागा आहेत. बी. टेक. कृषी अभियांत्रिकीच्या १५ महाविद्यालयांत ८८० जागा आहेत.

अभ्यासक्रमनिहाय अनुदानित जागाअभ्यासक्रम - महाविद्यालय - जागाबी. एस्सी. (ऑनर्स कृषी) - २२ - २२४८बी. एस्सी. (ऑनर्स उद्यान विद्या) - ६ - ३३२बी. एस्सी. (ऑनर्स वनशास्त्र) - २ - ८२बी. एस्सी. (ऑनर्स समुदाय विज्ञान) - १ - ६०बी. एस्सी. (ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन) - १ - ६०बीएफसी (फिशरी सायन्स) - १ - ४०बी. टेक. (अन्नशास्त्र) - ३ - १६०बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) - ५ - ३०४बी. टेक. (जैव तंत्रज्ञान) - २ - १००

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण