शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता मुलीचा मृतदेह ४ दिवसांनंतर शेतातील विहिरीत आढळला, छत्रपती संभाजीनगरात खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:27 IST

चार दिवसांनंतर धक्कादायक बाब उघडकीस, दोन दिवस विहीर तपासूनही मृतदेह दिसला नव्हता; शवविच्छेदनानंतर होणार मोठा खुलासा

छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर गेले होते, घराजवळच खेळणारी अवघी पाच वर्षीय राशी चव्हाण अचानक बेपत्ता झाली आणि चौथ्या दिवसी तिचा मृतदेहच मिळाला. मंगळवारी दुपारी हरवलेली ही चिमुकली शुक्रवारी दुपारी परिसरातीलच एका विहिरीत तरंगताना आढळली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी या विहिरीत तपासणी करण्यात आली होती. तेव्हा मात्र मृतदेह मिळून आला नव्हता. शनिवारी शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेशातील सेंधवा येथील राम चव्हाण पत्नी, मुलांसह पिसादेवी- पळशी रस्त्यावरील ओंकार सिटी बांधकाम प्रकल्पावर काम करून तेथेच वास्तव्यास असतात. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ते कामात व्यस्त असताना त्यांची पाच वर्षांची मुलगी राशी शाळेतून घरी परतली. त्यानंतर लगेच ती समवयस्क मुलींसोबत खेळायला गेली. मात्र, दुपारी ३ वाजता तीच्या आई-वडिलांनी तीला आवाज दिला; पण राशी दिसून आली नाही. आसपास शोध घेऊनही ती दूरपर्यंत राशी सापडली नाही. त्यानंतर कुटुंबाने तत्काळ चिकलठाणा पोलिसांकडे धाव घेतली. पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, सहायक निरीक्षक समाधान पवार, पवन इंगळे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.

सायंकाळी ६ वाजता आढळला मृतदेहबुधवारपासून स्थानिक गुन्हे शाखा, चिकलठाणा पोलिसांची चार पथके तिचा शोध घेत होते. शुक्रवारी ती परिसरातीलच एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा दुपारपासून त्याच परिसरात राशीचा शोध सुरू केला. राशी राहत असलेल्या घरापासून साधारणत: २०० ते ३०० मीटर अंतरावरील पारधेश्वर मंदिराजवळील शेतात पाण्याने भरलेली विहीर आहे. काही कर्मचाऱ्यांनी तेथे पाहिले. तेव्हा सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास राशी त्या विहिरीत तरंगताना आढळली. ही धक्कादायक बाब कळताच पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली.

श्वान पथक, अग्निशमन विभागाला पाचारणपोलिसांकडून घटना कळताच अग्निशमन अधिकारी विजय राठोड, सोमीनाथ भोसले, अग्निशामक जवान अनिकेत लांडगे, राजू राठोड, लालचंद दुबेले, विलास झरे, सी. आर. गीते यांनी धाव घेतली. जवळपास अर्ध्या तासानंतर राशीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर श्वानाने परिसरात काही माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले.

मृतदेह कुजलेला, शाळेचा गणवेश, शूजही तसेचराशीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तीन ते चार दिवसांपासून तो पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश, शुजही तसेच होते. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. हे पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing girl found dead in well after four days, parents grieve.

Web Summary : A five-year-old girl, Rashi Chavan, missing for four days, was found dead in a well near her home in Chhatrapati Sambhajinagar. Police are investigating the circumstances surrounding her death; the body was discovered during a search.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर