अल्पवयीन दुचाकीस्वार सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:52 IST2018-10-21T18:52:28+5:302018-10-21T18:52:44+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सर्रासपणे वाहतूक नियम मोडून अल्पवयीन दुचाकीस्वार वाहने पळविताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह पालकही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.

अल्पवयीन दुचाकीस्वार सुसाट
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सर्रासपणे वाहतूक नियम मोडून अल्पवयीन दुचाकीस्वार वाहने पळविताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांसह पालकही याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
सध्या तरुण पिढीत वाहने सुसाट चालविण्याची स्पर्धाच लागलेली दिसते. परिवहन कायद्याच्या नियमानुसार १८ वर्षांखालील मुलांना वाहने चालविण्यास बंदी आहे. मात्र, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाळूज महानगर परिसरात सर्रास अल्पवयीन मुले दुचाकी भरधाव चालवत आहेत.
बजाजनगर, पंढरपूर, सिडकोे, रांजणगाव, वाळूज आदी परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यासह शाळा- विद्यालय परिसरात ही मुले बिनधास्तपणे ट्रीपल सीट धूमस्टाईल कायम ये-जा करतात. अचानक समोरून एखादे वाहन आल्यास मुलांना वाहनावर नियंत्रण मिळविणे अवघड होत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
बहुतांशी अशा घटनेत समोरच्या वाहनधारकांचा दोष नसतानाही त्याला जायबंदी व्हावे लागते, वेळप्रसंगी जीवही गमवावा लागतो. रस्त्याने पायी ये-जा करणाऱ्यांनाही धडक दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार कोण, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत जनजागृती मोहीम राबविणार असून, मंगळवारी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे. सांगूनही वाहतुकीचे नियम मोडून वाहने चालविणाºया अल्पवयीन वाहधारकांसह त्याच्या पालकांवरही कारवाई केली जाईल.
- मनोज पगारे, पोलीस निरीक्षक, वाळूज वाहतूक शाखा