अल्पवयीन मुलीवर सावत्र मामानेच केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:29 IST2019-06-11T22:29:25+5:302019-06-11T22:29:46+5:30

औरंगाबाद : शिक्षणासाठी आलेल्या भाचीवर सावत्र मामाने बलात्कार केला. आरोपीला सिडको पोलिसांनी अटक केली असून, तीन दिवस पोलीस कोठडी ...

Minor girl raped by step mother | अल्पवयीन मुलीवर सावत्र मामानेच केला बलात्कार

अल्पवयीन मुलीवर सावत्र मामानेच केला बलात्कार

ठळक मुद्देतीन दिवस पोलीस कोठडी : कंटाळून मुलगी गेली होती मैत्रिणीकडे


औरंगाबाद : शिक्षणासाठी आलेल्या भाचीवर सावत्र मामाने बलात्कार केला. आरोपीला सिडको पोलिसांनी अटक केली असून, तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
२२ वर्षीय आरोपी तोरपांगरा (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथील रहिवासी असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सिडको परिसरात ही १७ वर्षीय मुलगी राहत होती. ती कुणाला काही न सांगता बेपत्ता झाल्याची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तिने मामाच्या घृष्णास्पद कृत्याला कंटाळून मैत्रिणीचे गोंदिया येथील घर गाठले. ७ महिन्यांपूर्वी त्याने तिच्यावर बळजबरी केली. कुणाला काही सांगितल्यास तुझ्या मित्राविषयीची माहिती वडिलांना सांगून तुझे शिक्षण बंद करीन, अशी धमकी देत अधूनमधून तो तिच्यावर अत्याचार करीत होता.
गोंदियाची मैत्रीण व मैत्रिणीच्या मामासह मंगळवारी ती सिडको पोलीस ठाण्यात आली. सदरील घटना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी सावत्र मामाला उचलून आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने तीन दिवस कोठडी दिली आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक बकाल यांनी जबाब नोंदविला असून, वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात मुलीला घेऊन गेले आहे.

Web Title: Minor girl raped by step mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.