दोन दुचाकीसह मुद्देमाल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 22:45 IST2019-05-05T22:45:50+5:302019-05-05T22:45:59+5:30
दोन दुचाकींसह डिक्कीतील जवळपास सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी बजाजनगरातील मोहटादेवी भाजीमंडई समोर घडली.

दोन दुचाकीसह मुद्देमाल लांबविला
वाळूज महानगर: चोरट्यांनी रसवंती समोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींसह डिक्कीतील जवळपास सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी सायंकाळी बजाजनगरातील मोहटादेवी भाजीमंडई समोर घडली.
राजेभाऊ सत्यभान कांबळे हे शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोहटादेवी भाजीमंडई समोरील रसवंतीसमोर दुचाकी (एमएच- २०, डीएस- ०७२९) उभी करुन रस घेण्यासाठी गेले. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीसह डिक्कीतील सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास केला.
तसेच कांबळे यांच्या दुचाकी शेजारी उभी असलेली एकजणाची दुचाकी (एमएच-२०, सीझेड- ३९८०) ही चोरट्यांनी लांबविली. या प्रकरणी राजेभाऊ कांबळे यांच्या फिर्यादीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.