शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमची पंकजा मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच ऑफर; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 16:57 IST

बीआरएस, एमआयएम दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

छत्रपती संभाजीनगर: बीआरएसने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्ष प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करू, अशी ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच, आम्ही दोन वर्षांपूर्वीच पंकजा मुंडे यांना ऑफर दिली होती, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री, तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची पक्षात कोंडी झाली आहे. त्यांनी वेळोवेळी यावर नाराजी व्यक्त करूनही पक्षाने त्यांचे अद्याप पुर्नवसन केले नाही. यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेश करून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. यावरची चर्चा सुरु असतानाच आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, बीआरएस आता म्हणत असले तरी आम्ही दोन वर्षे आधीच पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना संपर्क केला होता, मात्र यात पुढे काही होऊ शकले नाही. ओवसींच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बीआरएस आणि आता एमआयएम दोन्ही अपक्षांनी केलेल्या दाव्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. 

पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...: अंबादास दानवे पंकजा मुंडे बीआरएसमध्ये जातील का? असा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. यावर दानवे म्हणाले, पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. मी त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आज नाही तर उद्या नेतृत्व करतील. त्या भाजपत आत्ताही नेतृत्व करत आहेत आणि आतापर्यंत नेतृत्व करत आल्या आहेत. परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून नेतृत्व नाही असे कोणी सांगितले, असेही दानवे म्हणाले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद