घोटाळा लाखोंचा, शिक्षा फक्त पाचशेची !

By Admin | Updated: May 30, 2014 00:23 IST2014-05-29T23:20:47+5:302014-05-30T00:23:08+5:30

बीड:वडवणी येथील तत्कालिन ग्रामसेवकाच्या अपहार प्रकरणाचा अहवाल दडविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले होते़

Millions of scams, punishment is only five hundred! | घोटाळा लाखोंचा, शिक्षा फक्त पाचशेची !

घोटाळा लाखोंचा, शिक्षा फक्त पाचशेची !

बीड:वडवणी येथील तत्कालिन ग्रामसेवकाच्या अपहार प्रकरणाचा अहवाल दडविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले होते़ या ग्रामसेवकावर यापूर्वीही कारवाईचा प्रस्ताव होता; पण केवळ पाचशे रुपयांची वेतनवाढ रोखून त्यांना ‘क्लिनचीट’ देण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती उजेडात आली आहे़ वडवणी ग्रामपंचायतीतील तत्कालीन ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्यावर विकासनिधीत अपहार केल्याचा ठपका गटविकास अधिकार्‍यांनी १३ फेबु्रवारी २०१३ रोजी ठेवला होता़ ग्रामपंचायतीच्या खात्यातील तब्बल १४ लाख ४ हजार ६०७ रुपये इतकी रक्कम परस्पर उचलून घेतल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर होता़ डोंगरे यांच्यावर रीतसर कारवाई व्हावी, यासाठी गटविकास अधिकार्‍यांमार्फत सीईओ राजीव जवळेकर यांच्याकडे अहवाल आला होता; परंतु जवळेकरांनी डोंगरेंची केवळ ५०० रुपयांची वार्षिक वेतनवाढ रोखली़ लाखोंच्या घोटाळ्याचा ठपका असूनही डोंगरेंना फक्त ५०० रुपयांची शिक्षा दिली गेली़ वर्षभरानंतर डोंगरे यांनी १७ लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण पुढे आले़ डोंगरेंवर सुरुवातीलाच कारवाई झाली असती तर १७ लाख रुपयांचा अपहार झाला नसता अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत़ काय सांगतो शासन निर्णय? १२ जून रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश काढला आहे़ त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीला मिळणार्‍या निधीतील अपहार प्रकरणात ग्रामसेवकांवर केवळ प्रशासकीय कारवाई होते; परंतु अपहार करताना बनावट कागदपत्रे, स्वाक्षरी वापरली जाते़ त्यामुळे हा आर्थिक गुन्हा गंंभीर स्वरुपाचा आहे़ यापुढे ‘एमआयआर’ देखील नोंदवावा असे शासनादेशात स्पष्टपणे नमूद केलेले आहे़ (प्रतिनिधी) प्रस्ताव पुन्हा सीईआेंकडे! गुरुवारी ‘लोकमत’मध्ये ‘लाखोंचा अपहार दडविला’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यावर पंचायत विभागाने ग्रामसेवक व्ही़ आऱ डोंगरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला़ हा प्रस्ताव लवकरच सीईओंपुढे ठेवणार आहोत़ गटविकास अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत ग्रामसेवक डोंगरे यांनी केलेला प्रताप पुढे आलेला आहे़ त्यामुळे त्यांना वाचविण्याचा प्रश्नच नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले़

Web Title: Millions of scams, punishment is only five hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.