दलितवस्ती नसताना लाखोंची उधळपट्टी

By Admin | Updated: August 25, 2014 01:40 IST2014-08-25T00:18:09+5:302014-08-25T01:40:08+5:30

बीड : शासनाचा पैसा विकासाच्या नावाखाली कसा गडप केला जातो हे पहायचे असले तर केज तालुक्यातील विडा या गावाकडे पहा. या गावातील कल्याणवाडी व बुरंडवाडी

Millions of rupees in the absence of dalitavasti | दलितवस्ती नसताना लाखोंची उधळपट्टी

दलितवस्ती नसताना लाखोंची उधळपट्टी


बीड : शासनाचा पैसा विकासाच्या नावाखाली कसा गडप केला जातो हे पहायचे असले तर केज तालुक्यातील विडा या गावाकडे पहा. या गावातील कल्याणवाडी व बुरंडवाडी या वस्तीत दलिताचे एकही घर नाही;पण येथे दलित वस्ती विकास योजनेचा सव्वासात लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. ‘हपापाचा माल गपापाला’ या म्हणीप्रमाणे स्वत:चेच ‘कल्याण’ करुन घेण्यात ‘पटाईत’ असलेल्या गावकारभाऱ्यांसह ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विडा येथे कल्याणवाडी व बुरंडवाडी या दोन वस्तीत ७ लाख ३१ हजार ४२८ रुपये खर्च करुन विहीर व नळयोजना ही कामे दलित वस्ती विकासयोजनेतून करण्याचा घाट घातला होता. ११ जुलै २०११ रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याला तांत्रिक मान्यता बहाल केली. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या २७ जून २०११ रोजीच्या बैठकीत विषय क्र. सहा नुसार या कामाला मंजुरी मिळाली. तत्पूर्वी १ मे २०११ रोजी विडा ग्रामपंचायतीने हे काम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती.
कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येथे कामेही सुरु झाली़ त्यानंतर तक्रारी आल्यानंतर जि़ प़ सीईओ राजीव जवळेकर यांनी चौकशी केली़ या चौकशीत बुरंडवाडी, कल्याणवाडी येथे मागासवर्गीय प्रवर्गाचे एकही घर नसल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी येथील नळजोडणी व विहिरीचे काम रद्द करण्यात आले़ त्यानंतर या कामासाठी खर्च केलेला व उपलब्ध करुन दिलेला निधी तात्काळ जमा करण्याचे आदेश जवळेकर यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव तसेच ग्रामसेवक यांना दिले़
केवळ दोन लाखांचा निधी परत
२९ जानेवारी २०१४ रोजी विडा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी २ लाख १३ हजार ७५० रुपये जिल्हा परिषदेकडे जमा केले़ मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदेने समितीला सहा लाख ६८ हजार ९२८ हे अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन दिले होते तर लोकसहभागातून ६२ हजार ५०० रुपये जमा झाले होते़ एकूण सात लाख ३१ हजार ४२८ रुपये इतका निधी समितीकडे जमा होता़ (प्रतिनिधी)

कल्याणवाडी, बुरंडवाडी येथे दलित वस्ती नसताना सात लाख ३१ हजार ४२८ रुपये नियमबाह्यरित्या खर्च करणे ही गंभीर बाब आहे़
४त्यामुळे या प्रकरणी जबाबदार धरुन आपल्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी एफआयआर करण्यात का येऊ नये ? नियमबाह्य खर्च वसूल का करण्यात येऊ नये ? याच खुलासा आठ दिवसात द्यावा, अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी २ आॅगस्ट २०१४ रोजी कारणे दाखवा नोटिसीद्वारे दिली आहे़
४केज पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा विडा पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष विजय रामराव पटाईत, सचिव रमेश किसन दुनघव व तत्कालीन ग्रामसेवक बी़ एस़ शिंदे यांना ही नोटीस बजावली आहे़
४मात्र या नोटिशीचा अद्यापही खुलासा केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले़

Web Title: Millions of rupees in the absence of dalitavasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.