शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 7:23 PM

जिल्ह्यातील अनेक अधिग्रहित विहिरींनी गाठला तळ

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प कोरडेच आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला ९३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उपलब्ध पाण्याचे स्रोत कमी पडत आहेत. त्यामुळे यापुढे टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच अवलंबून राहाणार आहे. 

एप्रिल महिन्यात जवळपास टँकरचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयना विनंती करून नांदगाव तालुक्यातील गळमोडी प्रकल्प शंभर टक्के आरक्षित केला आहे. जिल्ह्यात तात्पुर्ती पूरक नळ योजना, विहिरींच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील गावांसाठी लागणारे सुमारे १००-११० टँकर भरले जाणार आहेत. फारोळ जलशुद्धीकरण केंद्राने टँकर भरण्यासाठी शनिवार, दि. २० एप्रिलपर्यंतचीच मुदत दिलेली असून, महापालिकेकडून आणखी काही दिवस टँकर भरण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींतून सध्या ४२८ टँकर भरले जातात. विहिरींमधील पाणी आटत चालल्यामुळे आगामी काळात तेथे भरण्यात येणाºया टँकरसाठी अन्य स्रोतांचा उपयोग करावा लागणार आहे. परिणामी, टँकर आणि पाण्याचे उद्भव यांच्यातील अंतर वाढल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, ग्रामीण नागरिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. यासाठी तालुकानिहाय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढील टंचाईच्या  काळात ‘एमआयडीसी’चेच पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवठा करावा लागणार आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडल्या जाणाºया आवर्तनामुळे गंगापूर तालुक्यातील ५०-६० गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यापुढे आणखी एक आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात जांभई जलशुद्धीकरण केंद्र आणि केळगाव धरणातून टँकर भरले जातात. 

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद