शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"मद्यप्रेमींची चिंता वाढणार!"; युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्यांचा साठा फक्त १५ दिवसांचा

By सुमित डोळे | Updated: March 13, 2026 19:44 IST

युद्धाच्या झळा एमआयडीसीला! मद्य कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान; रिकाम्या बाटल्या आणि कॅनसाठी गॅस मिळेना

छत्रपती संभाजीनगर : इराण, इस्त्रायल येथे भडकलेल्या युद्धाचा परिणाम आता जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर होण्याची दाट शक्यता आहे. मद्यासाठी लागणाऱ्या कॅन, बाटल्यांचा साठा केवळ पंधराच दिवसांचा उरला असून, जिल्ह्यावर २०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचे दाट सावट पसरले आहे. युद्ध थांबल्यानंतरही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे याचा जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यातील मद्यनिर्मितीतून राज्याला हजारो कोटींचा महसूल प्राप्त होतो. जगभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक नामांकित व्हिस्की तसेच बियर कंपन्यांचे उत्पादन वाळूज व चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये होते. मध्यपूर्व देशांमध्ये एबीडी, रॅडिको कंपनीच्या साधारण ५० कंटेनरद्वारे मद्यपुरवठा होतो. युद्धामुळे मात्र, यापैकी जवळपास ४० कंटेनरचा पुरवठा थांबवण्याबाबत कंपन्यांना सांगण्यात आले आहे. यापैकी आधीच जेएनपीटी बंदरावर पोहोचलेले पाच ते सहा कंटेनर तेथेच अडकून पडले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी निघालेले दोन कंटेनर मात्र सुरक्षितरीत्या पोहोचल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कशी होती निर्मितीजिल्ह्यात ६ व्हिस्की तर ६ बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. २०२५ अखेर जिल्ह्यातून जवळपास ४८३२.८३ कोटींचे मद्य उत्पादन झाले होते. यात विदेशी दारूचे सुमारे १.२६ कोटी लीटर तर बियरचे सुमारे १.४० कोटी लीटर उत्पादनाची नोंद झाली होती.

गॅस शॉर्टेजचा कॅन, बॉटल निर्मितीवर परिणाम-मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या व ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा असतो. हा आकार देण्यासाठी जो हायफ्लेम गॅस लागतो, त्याचा तुटवडा झाल्यास मद्यनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.-गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या बॉटल, कॅन निर्मितीवर होणार.-सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मद्य कंपन्यांकडे १५ दिवसांचा साठा आहे.-१५ दिवसांनंतर जवळपास प्रती महिना २०० कोटींच्या आसपास नुकसान सुरू होईल.-पंधरा दिवसांत अंदाजे दीड लाख केसेसची निर्मिती होऊ शकते. १ केसमध्ये २४ कॅन तर बारा बॉटल असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : War Threatens Alcohol Supply: Only 15 Days of Cans/Bottles Left

Web Summary : The Iran-Israel conflict threatens alcohol production in the district, with only a 15-day supply of cans and bottles remaining. This could lead to over ₹200 crore in losses. Gas shortages impacting bottle production further exacerbate the crisis, potentially halting production.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर