औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेने ४४ मिनिटे ३७ सेंकदांमध्ये एकूण ७२ प्रकारच्या लस्सी तयार करण्याचा विक्रम करुन इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
रविवारी इंडिया बूक ऑफ रेकॉर्डच्या वतीने परीक्षक म्हणून रेखा सिंग, नागेंद्र सिंग व विभा भाटिया यांच्यासमोर हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी अवघ्या ४४ मिनिटे ३७ सेंकदांमध्ये पेरु, चिकू, आंबा, काजू, द्राक्ष आदी विविध फळांचा स्वाद असलेल्या ७२ प्रकारच्या लस्सी तयार करण्याचा विक्रम केला.
यावेळी ‘एमजीएम’चे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. गिरीष गाडेकर, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. कर्नल प्रदीपकुमार, प्राचार्त अनिकेत जोशी आदींची उपस्थिती होती. इन्स्टिट्यूटच्या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशकुमार कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, प्रतापराव बोराडे आदींनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचे कौतुक केले.