मराठवाड्यासाठीचे हवामान अभ्यास केंद्र कागदावरच; पाच वर्षांत कृत्रिम पावसासाठी ७५ कोटींचा झाला चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 08:06 PM2021-07-05T20:06:51+5:302021-07-05T20:11:24+5:30

Meteorological study center for Marathwada News : २०१७ साली सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावरही ३० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता. म्हणजेच मागील पाच वर्षांत राज्यात तीन वेळा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते.

Meteorological study center for Marathwada on paper only; 75 crore for artificial rain in five years | मराठवाड्यासाठीचे हवामान अभ्यास केंद्र कागदावरच; पाच वर्षांत कृत्रिम पावसासाठी ७५ कोटींचा झाला चुराडा

मराठवाड्यासाठीचे हवामान अभ्यास केंद्र कागदावरच; पाच वर्षांत कृत्रिम पावसासाठी ७५ कोटींचा झाला चुराडा

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१५ व २०१९ मध्ये मराठवाड्यात केला होता प्रयोगएवढ्या खर्चात दोन रडार राज्यात बसविणे शक्य होते.

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील पाच वर्षांत दोन वेळा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला गेला. या प्रयोगावर २०१५ साली ३० कोटी तर २०१९ साली सुमारे ४५ कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला. या प्रयोगादरम्यान चिकलठाणा विमानतळावर कायमस्वरूपी हवामानाचे अभ्यास केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावदेखील कागदावरच राहिला. दोन वेळा प्रयोग करण्यात ७५ कोटींचा चुराडा शासनाने केला; परंतु मराठवाड्यातील असंतुलित हवामानाचा अभ्यास करण्यासाठी ४० ते ५० कोटींच्या किमतीचे एक्स बॅण्ड डॉप्लर रडार या विभागासाठी बसविले गेले नाही. ( spends  75 crore for artificial rain in five years in Marathwada ) 

२०१७ साली सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावरही ३० कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता. म्हणजेच मागील पाच वर्षांत राज्यात तीन वेळा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. एवढ्या खर्चात दोन रडार राज्यात बसविणे शक्य होते. २०१५ मध्ये सरकारने ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीला ३ महिन्यांसाठी २०० तास उड्डाण करण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपये दिले होते. कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे जनतेच्या डोळ्यांत निव्वळ धूूळफेक केल्याचा आरोप काही शास्त्रज्ञांनी केला होता. ३० कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सिडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. २०१९ साली कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ४५ कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला. दोन्ही वेळा विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलट्स, तंत्रज्ञांचा आवास, निवासाचा खर्च शासनाने केला होता. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात तातडीने एक्स बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यात यावे, अशा मागणीचे निवदेन हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी एप्रिल २०२१ मध्ये पंतप्रधानांना ई-मेलद्वारे पाठविले आहे.

अभ्यास केंद्राला मुहूर्त लागलाच नाही
मराठवाड्यातील पावसाच्या माहितीसाठी २०१७ पासून अभ्यास केंद्र कार्यान्वित होण्याची चर्चा होत आहे. आजवर त्याला मुहूर्त लागलेला नाही. अभ्यास केंद्रासाठी औरंगाबाद किंवा सोलापूर विमानतळ निवडण्यातच वेळ गेला. कृत्रिम पाऊस व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या विमानाच्या पार्किंगसाठी १५ हजार स्के.फूट.जागेची मागणी येथील विमानतळ प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. यानंतर मराठवाड्यासह तीन वेळा कृत्रिम पावसाचे प्रयोग राज्यात झाले. मात्र, अभ्यास केंद्र सुरू झाले नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या विभागाने औरंगाबादेत जागा मागितली होती.

Web Title: Meteorological study center for Marathwada on paper only; 75 crore for artificial rain in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.