पारा दोन अंशांनी घसरला
By Admin | Updated: April 18, 2016 00:51 IST2016-04-18T00:45:03+5:302016-04-18T00:51:09+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची पसरलेली लाट कायम आहे. शनिवारी पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलेला पारा रविवारी दोन

पारा दोन अंशांनी घसरला
जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची पसरलेली लाट कायम आहे. शनिवारी पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहचलेला पारा रविवारी दोन अंशांनी खाली उतरला खरा मात्र उन्हाचा कडाका हा कायम होता. रविवारी तापमान ४१ अंश एवढे होते.
जालना जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्यात चढ उतार होत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका हा प्रंचड वाढला आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ४३ अंश सेल्सिअस वर तर सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन अशांने घसरून ४१ अशांवर आला होता. तर कमाल तापमान हे २६ अंश सेल्सिअस होते. रविवारी मात्र सकाळी १० वाजेपासूनच पारा ४० अंशावर होता. दुपारी १ वाजेपर्यत तो स्थिर होता. त्यानंतर हा पारा ४१ अंशावर गेला होता. तो सांयकाळी ५ वाजेपर्यंत कायम होता. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जिल्ह्याचे तापमान हे ३४ अंश सेल्सिअसवर येवून ठेपले होते. मात्र रात्री प्रत्येक्षात ४१ अंश सेल्सिअस तापमानाचा उकाडा जाणवत होता.
जिल्ह्यातील परतूर व मंठा या दोन तालुक्यात ४२ अंश सेल्सिअस पारा होता. तर भोकरदन, जाफराबाद, अंबड , घनसावंगी व बदनापूर तालुक्यात पारा ४१ अंशावर कायम होता. पारा चढउतार होत असला तरी उष्णतेत काहीच परिणाम झाला नाही. उष्णतेची वाढ कायम असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.