कुख्यात भुºयाविरुद्ध व्यापाºयांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:52 IST2017-08-22T00:52:38+5:302017-08-22T00:52:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया ऊर्फ वाजीद कदीर कुरेशी याच्या त्रासातून मुक्तता करावी, या ...

merchants,complian to CP against Bhurya | कुख्यात भुºयाविरुद्ध व्यापाºयांची आयुक्तांकडे धाव

कुख्यात भुºयाविरुद्ध व्यापाºयांची आयुक्तांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया ऊर्फ वाजीद कदीर कुरेशी याच्या त्रासातून मुक्तता करावी, या मागणीसाठी पैठणगेट येथील व्यापाºयांनी पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले. व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
कुख्यात भुºया ऊर्फ वाजीद (रा. सिल्लेखाना) याच्याविरुद्ध लुटमार, चोरी, घरफोडीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. भुºयाने २५ ते ३५ वयोगटातील आणखी काही साथीदारांची टोळी तयार केली आहे. तो आणि त्याचे साथीदार पैठणगेट येथील लहान मोठ्या दुकानात घुसखोरी करून तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू उचलतात. चारशे ते पाचशे रुपये खंडणीची मागणी भुºया गँग करते.
अनेकदा तो रिक्षातून दुकानासमोर येतो आणि दुकानदारांना रिक्षाचे भाडे देण्यास सांगतो. जोपर्यंत त्या रिक्षाचे भाडे दुकानदार देत नाही तोपर्यंत तो दुकानासमोर रिक्षा उभी करून बसून असतो. विरोध करणाºयास तो शस्त्राचा धाक दाखवून धमकावीत असतो.

Web Title: merchants,complian to CP against Bhurya