राजकीय अंग की व्यापारी मन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:06+5:302021-09-23T04:06:06+5:30
७२ व्यापारी संघटना व ३० हजार व्यापाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवड यंदा प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. ...

राजकीय अंग की व्यापारी मन...
७२ व्यापारी संघटना व ३० हजार व्यापाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवड यंदा प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. या पदावर अनेकांची नजर असून, अनेक पदाधिकारी बाशिंग बांधून बसलेत. काहींनी तर देव पाण्यात ठेवले, अशी कुजबुजही कानी पडते आहे. आयुष्यात एकदा तरी अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, असे खासगीत बहुतांश बोलूनही दाखवत आहेत. महासंघाच्या ३२ वर्षांच्या काळात फक्त दोनदा निवडणुका झाल्या. अन्य ६ अध्यक्ष सर्वानुमते निवडले गेले. यंदा या परंपरेला छेद जाणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून आहे; मात्र नवीन अध्यक्ष राजकीय वर्तुळातील असेल की, व्यापार हीच जात मानणारा असेल ? राजकारण्यांचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो, अशी कुजबुज व्यापाऱ्यांत आहे.