शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील कापड विक्रेता निघाला मेरठ तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपी; १० वर्षानंतर झाली अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:02 IST

मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने बुधवारी (दि. २४ ) रात्री मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

औरंगाबाद :  मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने बुधवारी (दि. २४ ) रात्री मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. शहरातील लोटा कारंजा भागात तो कापड विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की,  बुधवारी रात्री गुन्हे शाखेचे एक पथक शहरातील सिटी चौक व जिन्सी भागात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील २००८ साली झालेल्या तिहेरी खून खटल्यातील फरार आरोपी समीउद्दीन कुरेशी (६० ) उर्फ शम्मी जैनुल अबदीन हा लोटा कारंजा येथे कापड विक्रीचा व्यवसाय करत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक मुधकर सावंत यांनी उत्तर पोलीस पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता, समीउद्दीन कुरेशी हा सुनील राजपाल धाक, सुधीर सुरेश पाल व पुनीत गिरी या तिघांच्या निर्घृण हत्या प्रकरणी मागील १० वर्षांपासून फरार असल्याचे सांगण्यात आले. यावरून गुन्हे शाखेने रात्रीच सापळा रचून लोटा कारंजा येथून कुरेशीला ताब्यात घेतले. 

ही कारवाई पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे - घाडगे व सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोह गजेंद्र शिंगाने, सुभाष शेवाळे, पोना विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, पोकॉ सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नितीन मुळे यांनी केली. 

तिघांची केली होती निर्घुण हत्या आरोपी कुरेशी आणि इजलाल यांनी सुनील राजपाल धाक, सुधीर सुरेश पाल व पुनीत गिरी या तिघांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. यानंतर तिन्ही मृतदेहाचे तुकडे करून त्यांनी गोण्यामध्ये भरून हिंदन नदी पूल भागात कारमध्ये भरून सोडले होते. याप्रकरणी काही आरोपी जेलमध्ये आहेत मात्र कुरेशी १० वर्षांपासून फरार होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक