महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुषांचा ‘कब्जा’
By Admin | Updated: August 2, 2014 01:50 IST2014-08-02T01:16:30+5:302014-08-02T01:50:37+5:30
सोमनाथ खताळ, बीड महिला, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, अंपग, महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आरक्षीत जागा असते.
महिलांच्या आरक्षित जागेवर पुरुषांचा ‘कब्जा’
सोमनाथ खताळ, बीड
महिला, ज्येष्ठ नागरीक, पत्रकार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, अंपग, महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आरक्षीत जागा असते. मात्र या आरक्षीत जागेवर सर्रास धनदांडगे, पुरूष, तरूण कब्जा करीत असल्याचे लोकमत ने केलेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले. गुरूवारी येथील बसस्थानकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाहणी करण्यात आली. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे याचे कुठलेही गांभीर्य महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसून येत आहे.
राज्य परिवहनच्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना आहेत. प्रत्यक्षात याची कुठेही अंमलबजावणी होत नाही. महिला प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा, यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये काही आसने महिलांसाठी आरक्षीत ठेवली. मात्र, सामाजिक जाणिवेचा विसर पडलेल्या पुरूष प्रवाशांकडून त्यावर अतिक्रमण केले जात असल्याचे समोर आले आहे. याकडे महामंडळातील अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
असा आहे नियम
एखादी लांब किंवा मध्यम पल्ल्याची गाडी असेल तर ज्याठिकाणाहून बस निघाली त्या ठिकाणी बस निघण्याचा आगोदर पाच मिनीटाने जागा आरक्षीत करणे आवश्यक आहे, आतमध्ये कोठेही ते राखीव जागेवर बसू शकत नाहीत. तर जनता गाडीत (आडनरी) कुठल्याही ठिकाणाहून महिला बसमध्ये आली की, तीला तीच्या आरक्षीत जागेवर बसण्याचा अधिकार आहे. कोणत्याही पुरूषाला ती हक्काने त्या जागेवरून (सामाजिक जाणीव ठेवून)उठवू शकते. आरक्षीत जागेचा हक्क प्रत्येकाने नियमाने मागावा, असे विभागीय नियंत्रक पी.बी.नाईक यांनी सांगितले.
पाहणी करून कारवाई करू
ज्या गाड्यांमध्ये आरक्षीत जागेवर अतिक्रमण केले जात आहे, याची आम्ही पाहणी करू. प्रवाशांनीही आपला हक्क आमच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधून मागावा. काही अडचणी वाटल्यास सदरील कर्मचाऱ्याची तक्रार आमच्याकडे करावी. विशेष म्हणजे याविषयावर जागृती होणे आवश्यक आहे, असे विभागीय वाहतूक अधिकारी जी.एम.जगतकर, आगारप्रमुख ए.यू.पठाण यांनी सांगितले.
असा आला अनुभव...
एम.एच. २० बी.एल. ११७९- विनाथांबा (औरंगाबाद) या बसमध्ये आम्ही दुपारी प्रवेश केला. यामध्ये भरपूर गर्दी होती. महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर दोन सुशिक्षीत व्यक्ती बसलेल्या होत्या व काही वृद्ध स्त्रिया उभ्या होत्या. आम्ही या प्रवाशांना उठण्यास सांगितले असता, ते म्हणाले या आजी काय माझ्या नातेवाईक नाहीत, तर मी का उठू? असे सांगितले. यावरून सुशिक्षीत व्यक्तीच नियमांचे उल्लंघण करीत असून त्यांना सामाजिक जाणिवेच भान राहिलेले नाही, असे दिसून येते.
सर्वेक्षणात आढळून आलेली स्थिती
आम्ही गुरूवारी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जनता गाड्यांची पाहणी केली. यामध्ये २८ बसमध्ये राखीव जागेवर दुसरीच व्यक्ती बसल्याचे दिसून आले. दोन गाड्यांमध्ये योग्य परिस्थिती होती. यातील १० बसमध्ये गर्दी खुप होती. यामध्ये महिला उभ्या असल्याचे दिसून आले. वाहकाला याचे गांभिर्य नव्हते. या सर्व उभ्या असलेल्या महिला सशिक्षीत व असुशिक्षीत असाव्यात असे दिसून आले.
यांच्यासाठी आहे जागा आरक्षित
बसमध्ये एकुण ४४ प्रवाशांसाठी जागा असते. यातील महिला-६, ज्येष्ठ नागरीक-२, पत्रकार-२, विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य-२, अंपग-२, महामंडळाचे कर्मचारी-२ अशा जागा राखीव आहेत.