शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

पुरुषांना नसबंदीची भीती, ९ महिन्यांत केवळ ४ जणांचीच शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:04 IST

जिल्ह्यातील गेल्या पावणेदोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर कुटुंब नियोजन व नसबंदी शस्त्रक्रियांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे.

ठळक मुद्देअनेक गैरसमज असल्याने पुरुषांतून उदासीनता, उद्दिष्टपूर्ती होईना

औरंगाबाद : पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांबद्दलचे अनेक गैरसमज असल्याने पुरुषांत उदासीनता दिसून येत आहे. गेल्या ९ महिन्यांत महिलांनी कुटुंब नियोजनाच्या २,०३४ शस्त्रक्रिया केल्या, तर केवळ चार पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. अवघ्या काही मिनिटांत होणाऱ्या या शस्त्रक्रिया पुरुषांनीही करणे महिलांपेक्षा सोइस्कर असताना, नसबंदी केवळ महिलांनी करावी, असाच अलिखित नियम झाल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

जिल्ह्यातील गेल्या पावणेदोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर कुटुंब नियोजन व नसबंदी शस्त्रक्रियांना मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. गेल्या नऊ महिन्यांत नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टाच्या केवळ ११ टक्के झाल्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ३ तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून १ पुरुष नसबंदी करण्यात आली. विशेष म्हणजे, मनपा हद्दीत एकही पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाली नाही. मात्र, शहरात महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची आकडेवारी अधिक दिसते. बाळंतपण, बालकांचे संगोपण, घरकाम सर्वच महिला करत असताना पुरुषांनी किमान नसबंदीत तरी पुढाकार घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहेत गैरसमज...पुरुषाने कुटुंब करावे, म्हणून विविध माध्यमांतून शासनाकडून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यता येते. पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेला अनुदानही प्रोत्साहनासाठी दिले जाते. मात्र, या शस्त्रक्रियेने नपुंसकता येते, जड काम करता येत नाही, असे अनेक गैरसमज असल्याने पुरुष या शस्त्रक्रियेसाठी समोर येत नाहीत. महिलाही पुरुषांना आडकाठी घालतात, अशी कारणे सांगितली जात असली, तरी यामागे पुरुषी मानसिकतेचेही कारण आहे.

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना घरातील सर्व कामे त्याच करतात. त्यामुळे नसबंदीत तरी पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. कुटुंब नियोजन कुटुंब कल्याणाचा मार्ग आहे.- अमोल निकम, आमखेडा

आदिवासी भागात मातृसत्ताक पद्धती आहे. तिथे पुरुष नसबंदीचे प्रमाण अधिक दिसते. मात्र, आपल्याकडे असलेल्या पुरुष मानसिकतेत महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. आज पुरुषांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे. गैरसमज दूर व्हावेत.- समाधान पंडित, औरंगाबाद

प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. माझ्यासह २४ अधिकाऱ्यांनीही शस्त्रक्रिया उदगीरमध्ये करून, आम्ही लातूरला अभियान राबविले होते. त्याला प्रतिसादही मिळाला होता. त्याच धर्तीवर हेल्थ वर्करमधून जिल्ह्यात एक हजार शस्त्रक्रियातून आधी केले आणि मग सांगितले, या उक्तीने व्यापक जनजागृतीचा प्रयत्न होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद नाही. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावोगावी विविध कल्पक पद्धतीने जनजागृती केली. पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.- डाॅ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, औरंगाबाद

एक नजर...शस्त्रक्रियांवरवर्ष २०१९११,०९५ एकूण शस्त्रक्रिया११,०६९ महिलांनी केलेल्या शस्त्रक्रिया२६ पुरुष नसबंदी

वर्ष २०२०२,०३८ एकूण शस्त्रक्रिया२,०३४ महिलांनी केलेल्या शस्त्रक्रिया४ पुरुष नसबंदी

टॅग्स :Medicalवैद्यकीयAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य