मनपाला शिवजयंतीचा विसर
By Admin | Updated: February 18, 2016 23:57 IST2016-02-18T23:48:59+5:302016-02-18T23:57:31+5:30
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला शिवजयंतीचाच विसर पडला.

मनपाला शिवजयंतीचा विसर
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पालिकेत गेल्या ३० वर्षांपासून सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला शिवजयंतीचाच विसर पडला. शासकीय जयंतीनिमित्त क्रांतीचौकातील शिवरायांच्या पुतळ्याला दरवर्षीप्रमाणे रोषणाई करण्याचे सौजन्यही पालिकेने यंदा दाखविले नाही. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
राज्यात तारखेप्रमाणे १९ फेबु्रवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्त दरवर्षी मनपाकडून शहरातील शिवाजी महाराज यांच्या क्रांतीचौकातील पुतळ्याजवळ साफसफाईसह भव्य रोषणाई केली जाते. यंदा मात्र, जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा पुतळा अंधारात होता. पालिका प्रशासनाने येथे कोणत्याही प्रकारची रोषणाई केलेली नव्हती. विशेष म्हणजे पालिकेत ३० वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. (पान २ वर)
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई केली नसल्याचे ‘लोकमत’ने शिवजयंती उत्सव समितीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर समितीचे अध्यक्ष संदीप शेळके, मनोज पाटील, मिलिंद पाटील, किशोर चव्हाण, विश्वास औताडे, भाऊसाहेब जगताप, अभय चिकटगावकर आदी क्रांतीचौकात दाखल झाले. त्यांनी मनपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.